कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी मोठा विजय
Satara News Team
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
- बातमी शेयर करा
कोलकाता : विराट काहलीच्या शतकाने भारताच्या विजयाला एक अनोखे कोंदण लावले. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२६ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची ससेहोलपट झाली आणि त्यामुळे भारताला या सामन्यात मोठा विजय साकारता आला. भारताने यावेळी दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी दणदणीत विजय साकारला.
रोहित शर्माने भारताला धडेकाबाज सुरुवात करून दिली. पण त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. रोहित बाद झाला आणि फलंदाजीला आला तो विराट कोहली. कोहली आणि गिल या जोडीने गेल्या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली होती. पण या दोघांचेही शतक हुकले होते. त्यामुळे हे दोघे या सामन्यात आपेल शतक पूर्ण करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच होती. कोहलीच्या खेळात आत्मविश्वास भरलेला पाहायला मिळाला. पण यावेळी गिलला मात्र कोहलीला जास्त वेळ साथ देता आली नाही. कारण गिल यावेळी २३ धावांवर बाद झाला. गिल बाद झाला आणि कोहलीला साथ देण्यासाठी यावेळी श्रेयस अय्यर मैदानात आला. त्यानंतर कोहली आणि श्रेयस यांनी आपली अर्धशतके पूर्ण केली आणि त्यांनी शतकाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. कोहली आणि अय्यर यांनी सत्तरीमध्ये प्रवेश केला आणि ते शतकासमीप जात होते. पण त्याचवेळी भारताला धक्का बसला तो श्रेयस अय्यरच्या रुपात. कारण श्रेयस ७७ धावांवर बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यावेळी मोठी खेळी साकारू शकले नाही. पण विराट कोहलीने मात्र रवींद्र जडेजाबरोबर खेळताना धमाकेदार फटकेबाजी केली आणि त्यामुळे भारताला ३०० धावांचा पल्ला गाठता आला. जडेजाच्या साक्षीने यावेळी कोहलीने आपेल ४९ वे वनडे शतक पूर्ण केले.
भारातच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात सावरू शकला नाही. भारताने एकामागून एक त्यांना धक्के दिले आणि त्यांचा अर्धा संघ ४० धावांत बाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकणार नाही हे स्पष्ट झाले होते.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 5th Nov 2023 08:43 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sun 5th Nov 2023 08:43 pm













