पांगारे हल्लाप्रकरणी १३ जणांना अटक

सातारा :  पांगारेतील युवकाच्या घरावर मध्यरात्री राजापुरी गावच्या युवकांनी हल्ला केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील १३ जणांना अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आकाश आत्माराम मोरे (वय २०), सुयोग जयसिंग गुरव (वय २३), यश दीपक निकम (वय १९), गजानन आनंदराव मोरे (वय २७), तुषार शंकर साळुंखे (वय २३), गणेश तात्याबा मोरे (वय २७), जगदीश शंकर साळुंखे ( वय २०), प्रथमेश भाऊसो साळुंखे ( वय १९), प्रतीक सतीश साळुंखे (वय २१), गणेश युवराज मोरे, संकल्प संजय साळुंखे, आविष्कार संजय साळुंखे (सर्व रा. राजापुरी, ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
राहुल शिवाजी पवार (वय ३०, रा. पांगारे, ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५ मे रोजी गणेश मोरे आपल्या मित्रांसह पांगारे गावात कार्यक्रमासाठी आला होता. दरम्यान, नयन पवार व त्याचा भाऊ राहुल शिवाजी पवार यांच्यासोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की करत दमदाटी केली. यानंतर हा वाद मिटला असे वाटत असतानाच त्याच रात्री ३० पेक्षा अधिक संशयितांनी पांगारेत जावून राहुल पवार व नयन पवार यांच्या घरावर हल्ला केला. संशयितांनी हल्ल्यामध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली. यामध्ये राहुल पवार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सुरुवातीला सातारा येथे उपचाराला सुरुवात झाली. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त