पोलिस कर्मचाऱ्याचे प्रसंगावधान आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

सातारा : सातारा शहर डीबीचे पोलिस कर्मचारी सुजीत भोसले आणि करंजे महावितरण विभागाचे तानाजी कसबे व दशरथ वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत दाखवलेल्या तत्परतेने आज एखादी दुर्घटना टळल्याचे पहायला मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी सुजीत भोसले हे त्यांची रात्रगस्त ड्युटी करुन घरी जात असताना शाहूपुरी येथील साईदर्शन कॉलनीजवळील रस्त्यावर विद्युत वाहक तार तुटलेली व लोंबकळत असलेल्या स्थितीमध्ये दिसून आली. सदरचे ठिकाणी पूर्णपणे अंधार होता व सदर ठिकाणी चालत येणाऱ्या व्यक्तीस तसेच मोटरसायकल व चार चाकी वाहनास सदर वायरचा अचानकपणे स्पर्श होऊन गंभीर घटना होऊ शकते. याची जाणीव झाल्याने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी सातारा मधील पोवई नाका, राजवाडा, करंजे या महावितरण विभागास संपर्क केला. रात्र ड्युटीचे असणारे महावितरण विभागाचे कर्मचारी यांनी देखील तात्काळ मदत होण्याकरता हालचाली केल्या. महावितरण विभागाची मदत पोहोचेपर्यंत त्यांनी स्वतः सदर ठिकाणी थांबून मॉर्निंग वॉक करणारे लोकांना सदर प्रकार बाबत जागरूक करून दक्षता घेण्याबाबत थांबवून ठेवले. काही वेळातच करंजे महावितरण विभागाचे तानाजी कसबे व त्यांचे सहकारी दशरथ वाघमोडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदरची चालू विद्युत वाहिनी बंद करून प्राथमिक उपाययोजना केली. तसेच काही वर्षांपूर्वी सदर घटनेपासून काही अंतरावर अशाच प्रकारे पहाटेच्या वेळी चालू विद्युत वाहिनी कडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन वयोवृद्ध व्यक्तीं गंभीर जखमी झाल्याबाबतची घटना सांगितली. महावितरण विभागाचे पोवई नाका, राजवाडा, करंजे पेठ येथील रात्र ड्युटीचे कर्मचारी यांनी पहाटेची वेळ असताना देखील तात्काळ फोन उचलून घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत केल्याने गंभीर धोका टाळलेला आहे. या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सदर शाहूपुरी कॉलनीतील लोकांनी आभार मानून त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त