पिंपोडे बुद्रुक परिसर होणार पाणीदार सर्व तलावांची कामे प्रगतीपथावर

पिंपोडे बुद्रुक परिसर होणार पाणीदार सर्व तलावांची कामे प्रगतीपथावर

कोरेगाव :  तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या प्रमुख व्यापारी केंद्र पैकी एक पिंपोडे बुद्रुक हा परिसर कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या परिसरातील शेती पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने आणि सासवड येथील ग्रामगौरव प्रतिष्ठानने विशेष पुढाकार घेतला आहे.

संयुक्त विद्यमाने त्यांनी काट्याचा तलाव आणि जननी ओढ्यावरील सर्व तलावांचे काम हाती घेतले आहे. ही कामे प्रगतीपथावर असून लवकरच सर्व तलावांमध्ये पाणीसाठा होणार आहे. पिंपोडे बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह योगेश चव्हाण व बोरावके यांनी तलावाच्या कामांची शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणा चालकास आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक हे गाव माढा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात येते. सुमारे वीस ते पंचवीस गावांची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ती ओळखली जात असून या परिसरात पाण्याचा प्रश्न मोठा होता. आता हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून पाणलोटच्या कामांमुळे परिसर निश्चित हिरवागार होईल, असा विश्वास योगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त