माजी सैनिक प्रशांत कदम यांचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराणे सन्मान
कुलदीप मोहिते
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
- बातमी शेयर करा

कराड : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्र राज्याचे 15 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथील प्रेस क्लब नागपूरच्या सभागृहात राज्य पत्रकार संमेलन आयोजीत करण्यात आले होते.या संमेलनात प्रेरणादायी कार्य केल्याची दखल घेऊन ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल तर्फे माजी सैनिक प्रशांत कदम यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
15 डिसेंबर रोजी मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. माजी सैनिक प्रशांत कदम त्यांनी नुकतीच सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली होती. आजी - माजी सैनिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रशांत कदम हे 25 ऑक्टोंबर 1991 रोजी सैन्य दलात भरती झाले. 30 सप्टेंबर 2007 रोजी ते सेवानिवृत्त झाले.
त्यांनी 16 वर्षे 11 महिने सैन्य दलातील सेवा केली. यादरम्यान त्यांनी बॉम्बे इंजीनीरिंग ग्रुपमध्ये जम्मू कश्मीर डोडा जिल्हा, सी.आय. डेल्टाफोर्स, नारिया, नवशेरा सेक्टर, उत्तर प्रदेश मेरठ २२ इन्फंट्री डीव, राजस्थान बिकानेर, नॉर्थ ईस्ट सिलूगुडी, पंजाब अमृतसर, हैदराबाद, पुणे येथे सेवा बजावली. सेवानिवृत्ती त्यांनी 5 मे 2008 रोजी यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव (उंब्रज) ची स्थापना केली. या माध्यमातून भारतीय सैन्यामध्ये, महाराष्ट्र पोलीस, अर्धसैनिक बल यामध्ये भरती होणाऱ्या तरुण - तरुणी, युवक वर्गासाठी फिजिकल ट्रेनिंग भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना, यशवंत चारिटेबल ट्रस्टचे माध्यमातून 2008 पासून शालेय विध्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक मिळणाऱ्या व स्पोर्टमध्ये भाग घेणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित केले व आज तगायात सुरू आहे.गोरगरीब गरजू कुटुंबांना यशवंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करोना काळात व अतिवृष्टी काळात मदत. 2017 मध्ये त्यांच्या राजकीय वाटचालीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.
यामध्ये त्यांनी 2017 मध्ये सातारा जिल्हा उपाध्यक्ष सैनिक आघाडी, भारतीय जनता पार्टी, सदस्य ग्रामविकास विविध कार्यकारी सोसायटी वडगाव (उंब्रज) 2010 - 15, चेअरमन ग्राम विकास विविध कार्यकारी सोसायटी वडगाव (उंब्रज) 2011 - 12 या काळात सेवा केली. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. अध्यक्ष, यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव, (उंब्रज) 5 मे 2008, अध्यक्ष, कराड तालुका सैनिक फेडरेशन महाराष्ट्र 30 ऑगस्ट 2021, कार्याध्यक्ष, सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन महाराष्ट्र 27 जानेवारी 2022, महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान माजी सैनिक संघटना प्रतिनिधी कराड तालुक 15 मे 2022 व सातारा जिल्हा संरक्षण समिती सदस्य,अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन 12 डिसेंबर 2022 त्यांनी विविध स्तरावर सामाजिक कार्य केले. त्यांनी अनेक कार्यक्रम आणि उपक्रमही राबवले. यामध्ये आजी /माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांचे समस्या सोडवण्यासाठी व त्यांना सन्मानाची वागणूक समाजामध्ये प्रशासनामध्ये मिळवून देण्यासाठी केलेले काम व राबवलेले कार्यक्रम, आजी/माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री व प्रशासनाला निवेदन दिले, आजी/माजी सैनिकांना मालमत्ता कर सूट, स्वस्त धान्य रेशन मिळण्यासाठी प्रयत्न, जमीन व रस्त्यांसंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत प्रयत्न, पोलीस प्रशासनामध्ये सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व पाठपुराव्याला यश मिळाले असून संबंधित विभाग व प्रशासनाने परिपत्रकही काढले आहे.
तसेच "अमृत वीर जवान अभियान" महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. 13 एप्रिल 2022 ला महाराष्ट्र शासनाने "अमृत वीर जवान अभियान" राबवण्यासाठी शासन निर्णय जाहीर झाला. माजी सैनिकांच्या बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवेदन निबंध को सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कराड तालुक्यामध्ये यशवंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आजी- माजी सैनिक संपर्क अभियान मेळावा व सैनिक, पोलीस, शहीद परिवार सन्मान सोहळा व दर वर्षी सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान सोहळा घेण्यात येतो. अमृत वीर जवान अभियान 2022 अंतर्गत सैनिकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याचबरोबर विविध तक्रारी अर्जांचा निपटारा व प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये शहीद जवानांच्या पत्नीला व आई-वडिलांना निमंत्रित करणेबाबत व माजी सैनिकांचा सन्मान करणेबाबत प्रशासनाला निवेदन 26 जुलै हा कारगिल विजय दिवस संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन, "हर घर तिरंगा" या कार्यक्रमांतर्गत सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांनी घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग, "अग्निपथ" योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सर्व माजी सैनिक व गावोगावी कॉलेज, हायस्कूल, अकॅडमीमध्ये जाऊन या योजनेबद्दल सकारात्मक माहिती सांगितल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री ना. सोम प्रकाश यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
वरील सर्व सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल यांच्यावतीने नागपूर येथे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या.वेळी या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री यासिन पटेल, केंद्रीय अध्यक्ष श्री.गणेश कोळी, सचिव बाळकृष्ण कासार, विश्वस्त श्री.अतुल होनकळशे सर्व पत्रकार बंधू,विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
संबंधित बातम्या
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
- Mon 16th Dec 2024 04:35 pm
-
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
- Mon 16th Dec 2024 04:35 pm