अदिती स्वामी,, ज्योती, परनीतने सुवर्णपदकावर मोहोर उमटवत इतिहास घडविला

बर्लिन (जर्मनी) : अदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर या भारताच्या तीन महिलांनी शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. या तिन्ही खेळाडूंनी बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.जागतिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले हे विशेष. भारताच्या त्रिमूर्तीने सुवर्णपदकासाठीच्या लढतीत मेक्सिकोच्या महिला तिरंदाजांना २३५-२२९ असे पराभूत केले आणि भारतासाठी देदीप्यमान कामगिरी नोंदवली.
भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीन तैपईच्या संघावर २२८-२२६ असा विजय साकारला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. भारतासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत कोलंबियाचे आव्हान होते. अदिती, ज्योती व परनीत यांनी कोलंबियाच्या तिरंदाजांसमोरही जबरदस्त खेळ केला. भारताने उपांत्य लढत २२०-२१६ अशी जिंकली.

कोरियाची ब्राँझपदकाला गवसणी

महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात कोरियाने ब्राँझपदकाला गवसणी घातली. कोरिया-कोलंबिया यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत रंगली. या लढतीत कोरियाने कोलंबियावर २३०-२२५ अशा फरकाने मात केली आणि तिसरा क्रमांक पटकावला. कोरियाच्या संघात सो चेईओन, ओह यूह्यून व साँग सू या खेळाडूंचा समावेश होता.

ध्येय साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त

अदिती स्वामी, ज्योती सुरेखा व परनीत कौर या सुवर्णपदक विजेत्या तिरंदाजांनी आनंद व्यक्त केला. तिघींनी हे सुवर्णपदक स्पेशल असल्याचे नमूद केले. जागतिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. याचा दबाव आम्ही घेतला नाही. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

चार खेळाडूंचा कस

भारतीय तिरंदाजांना जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये आणखी पदके जिंकण्याची संधी असणार आहे. भारताचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. महिला वैयक्तिक कंपाऊंड गटात तीन, तर पुरुष वैयक्तिक कंपाऊंड गटात एक खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे.

परनीत कौर-ज्योती सुरेखा यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरी होणार असून यांच्यापैकी एकीलाच पुढे जाता येणार आहे. तसेच अदिती स्वामीसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सॅने लाट हिचे आव्हान असणार आहे. ओजस देवतळे याला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत प्रेजमायस्लॉ कोनेकी याच्याशी दोन हात करावयाचे आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त