वडगाव येथील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे तीन युवकांना अटक

बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस औंध पोलीसांनी १० तासात गुन्हयाची उकल करून ठोकल्या बेडया.

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. ०७/०८/२०२२ रोजी रात्रौ ०२.३० वाचे सुमारास काही अज्ञात चोरटयांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीच्या आधारे गुप्त माहितीदार पेरून तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी काही पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत बँक कर्मचारी यांनी सुरक्षीत ठेवलेला मुद्देमालाची खात्री केली, त्यांना रोख रक्कम व सोने चांदीचे दागिण्याचा एकुण १,९५,९०,४४१ रूपयाचा मुद्देमाल सुरक्षीत मिळून आला. त्यानंतर याबाबत औध पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६५ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०,५११, ४२७ दाखल करीत असताना औंध पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय.पी. दराडे यांनी पोलीसांच्या तिन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्हयात वापरण्यात आलेल्या चार चाकी स्कॉरपीओ क्रमांक एम एच ०६ क्यू. ८८८८ ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज.स्वा. ता. खटाव येथून ताब्यात घेण्यात आले.
    सदर गुन्हयातील तपासाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे मदतीने व सीसीटीव्ही फुटेज चेक करून व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून खालील आरोपी नंबर १) हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे वय २० वर्षे रा. शाहुनगर ता. जि. सातारा, आरोपी नंबर २) यश संजय घार्गे वय १९ वर्षे रा. दौलत नगर ता. जि. सातारा आणि आरोपी नंबर ३) रूषीकेश सोमनाथ नागमल वय २० वर्षे रा. वडगांव ज.स्वा.ता.खटाव जि.सातारा यांना सदर गुन्हयाच्या कामी १० तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.
   सदरील कारवाई श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, श्री अजित बो-हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचनेप्रमाणे श्री निलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनासाखाली सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलीस उप निरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सपोफी जाधव, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला