सातारा न्यूजच्या बातमीने प्रशासन खडबडून जागे पाटखळ माथा येथील कचऱ्याची विल्हेवाट

शिवथर :  पाटखळ माथा ता. सातारा येथे भरवस्थित घाणीचे साम्राज्य उभे राहिले असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता ही बातमी दैनिक सातारा न्यूज ने प्रसिद्ध केली होती त्याची प्रशासक ग्रामसेवकांनी तातडीने दखल घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावली असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले
पाटखळ माथा येथे साधारण दीड हजाराच्या आसपास लोक वस्ती असून पाठखळ ग्रामपंचायतीचाच तो भाग असल्याने विचकर आरोग्य कर घरपट्टी आकारणी पाटकळ ग्रामपंचायत घेत असते परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाल संपल्याने प्रशासक नेमण्यात आला आहे त्यांच्याकडून या ग्रामस्थांकडे नजर चुकिने का जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात होते हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला होता बरेच दिवस कचरा मोठ्या प्रमाणात साठवून राहिल्याने दुर्गंधी पसरली होती वारंवार ग्रामस्थांनी सांगून सुद्धा प्रशासकाने दुर्लक्ष केले होते त्याची खबरदारी घेऊन सातारा न्यूज ने आवाज उठवला त्यामुळे तातडीने बातमी प्रसिद्ध झाल्या झाल्या कचरा उचलून ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत दखल घेतली गेली असल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त