कोरेगाव शहरातील प्रसिद्ध सोनारास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या खंडणी बहाद्दर आरोपी राजेंद्र मोहितेस अटक 

कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपी मोहिते यास अटक केल्याने कोरेगाव पोलिसांचे  मोठे यश

सातारा न्यूज - कोरेगाव : कोरेगाव  येथील लक्ष्मी नगर परिसरातील जुनी रेल्वे लाईन येथील राजेंद्र भगवान मोहिते या आरोपीस धमकी देऊन जीवे मारण्याची भीती दाखवून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या राजेंद्र भगवान मोहिते या आरोपीस केवळ 48 तासांमध्ये जेर बंद करण्यास कोरेगाव पोलिसांना यश आले आहे.
.  कोरेगाव पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी कोरेगाव शहरातील प्रसिद्ध सोनारास त्याचा चांगुलपणाचा फायदा घेऊन त्याचे मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन भीती दाखवून चोरीच्या वेगवेगळ्या मोबाईल वरून फोन करून आरोपी राजेंद्र मोहिते एका गुंडाचे नाव घेऊन वीस लाखाची खंडणी मागत होता. घडलेल्या घटनेमुळे व्यापारी व त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार भयभीत झालेले होते. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दिली होती तक्रारीचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय बंसल माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अजित बोराडे माननीय पोलीस उपाधीक्षक श्री गणेश केंद्रे यांनी गुन्हा उघडकीस आणणे कामी सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री नितीन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना शिंदे व पोलीस निरीक्षक विशाल कदम पोलीस अंमलदार यांनी गोपनीयता राखून बुद्धी व कौशल्याने मोबाईल संबंधित तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित मोबाईल क्रमांक हस्तगत केले. सुरुवातीस खंडणीखोराच्या मोबाईल हँडसेट व सिम कार्ड खरेदी बाबत कोरेगाव शहरातील मोबाईल शॉपी चालक मालकाकडे चौकशी केली असता कोल्हापूर जिल्ह्यात धागेदोरे असल्याचे समजून आले, परंतु पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता सिमकार्ड कोल्हापुरातील इसमाचे व त्याचा वापर सातारा जिल्ह्यात होत असल्याचे समजून आले. संबंधित व्यापाऱ्यास आरोपी राजेंद्र मोहिते खंडणीखोराने खंडणीची  रक्कम घेऊन त्रिपुटी खिंड  परिसरात बोलवले होते. त्यावेळी त्या ठिकाणी कोरेगाव पोलीस स्टेशन कडील अधिकारी व पोलीस अंमलदार असे 15 ते 20 जणांनी पोलीस उपाधीक्षक श्री गणेश केंद्रे व पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली खंडणीखोरास पकडणे करता, कोणी शेतकऱ्यांचे तर कोणी वारकऱ्यांचे वेशांतर करून कोरेगाव ते खावली गावापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरात, खाणीत तसेच  झाडाझुडपात दिवसभर थांबून सापळा रचलेला होता,परंतु खंडणीखोरास त्याची शंका आलेने त्या ठिकाणाहून पळून गेला. आरोपी मोहिते याने शाळा करतो काय, तुला बघून घेतो अशी दमकावून त्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद ठेवला. त्यानंतर मात्र सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना आव्हानात्मक होते. त्यानंतर पोलिसांनी पंचक्रोशीतील भुईंज व पुसेगाव परिसरातील असंख्य मोबाईल संबंधी माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण करून खास बातमीदार नेमून माहिती प्राप्त केली असता संशयित आरोपी मोहिते ओळख लपवून कोरेगाव हद्दीतील लक्ष्मी नगर येथील जुनी रेल्वे लाईन परिसरात लपून बसल्याचे समजून आले. आणि त्या ठिकाणी सापळा रचून त्यास पोलिसांनी मोठ्या सिताफिने  पकडले  त्याचे कब्जात घातक हत्यारासह गुन्ह्यात वापरलेला मोबाईल मिळून आला, त्यामुळे त्याचे कडे सुरुवातीस विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर मोबाईल संबंधित तांत्रिक माहिती बाबत सांगून विश्वासात घेतले असता त्याने त्याचे साथीदारासह संबंधित व्यापारास आर्थिक अडचण असल्याने खंडणी मागितल्याचे कबूल केले. राजेंद्र मोहिते या खंडणी बहादरास कोरेगाव पोलिसांनी 48 तासात जेरबंद केल्याने पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. तर आरोपी राजेंद्र मोहिते यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचा साथीदाराचा शोध चालू आहे गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना शिंदे या करीत असून  कोरेगाव शहरातील मोबाईल शॉपी चालक व मालकांना गिऱ्हाईकांचे कागदपत्राची खातरजमा केल्याशिवाय सिम कार्ड व मोबाईल विक्री न करणेबाबत आवाहन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला