जालन्यातील कंपनीला कारणे दाखवा नोटीस
वादळी पाऊस आल्याने कॅमेरा थोड्या वेळासाठी बंद पडला होताSatara News Team
- Mon 13th May 2024 11:39 am
- बातमी शेयर करा
सातारा : लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 07 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या सर्व ईव्हीएम मशीन्स शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. सदर मशीन्स च्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय पोलिस यंत्रणेसोबत 62 सीसीटीव्ही कॅमेऱ याठिकाणी आहेत. यापैकी शनिवार, दि.10 रोजी झालेल्या वादळी पावसानंतर एका कॅमेरात तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्हीतील चलचित्रे किंचित खालीवर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. ही बाब समजताच जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या आदेशानुसार तेथेच नेमणुकीला असलेल्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाने तातडीने पाच मिनिटात दुरुस्ती करून सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पूर्ववत केली.
याबाबत माहिती अशी, सातारा लोकसभेसाठी दि.07 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 18 लाख 89 हजार 749 पैकी 11 लाख 91 हजार 869 मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन्स पोलिस बंदोबस्तात सातारा येथील शासकीय गोदामात आणण्यात आली. यानंतर ही सर्व ईव्हीएम मशीन्स तीन स्तर असलेल्या सुरक्षा कवचात ठेवण्यात आली असून गोदामात कडेकोट बंदोबस्त आहे. याशिवाय गोदाम व परिसरात तब्बल 62 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा आहे. गोदामाच्या प्रत्येक गेटवरती चार कॅमेरे आहेत. तसेच उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधी यांना गोदामाची सुरक्षेची पाहणी करण्यासाठी तीन टीव्ही संचांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना पाहण्यासाठी कंट्रोल रुम मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान, दि.10 रोजी सातारा व परिसरात वादळी पाऊस झाला. यामुळे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्हीतील चलचित्रे किंचित खालीवर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. तथापि इतर सर्व कॅमेरे सुस्थितीत होते व त्यामधील यंत्रणा चालू होती. एका कॅमेर्यातील अडचणी बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्याठिकाणी नेमणुकीवर असलेल्या तंत्रज्ञाला तातडीने आदेश दिल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. केवळ एका कॅमेर्याच्या चलचित्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती, तथापि सदर दुरुस्ती करुन संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने अद्यावत केलेली आहे.
जालन्यातील कंपनीला कारणे दाखवा नोटीस
हा प्रकार वादळी पावसाने झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली आहे. संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत याठिकाणी स्वतः समक्ष हजर रहावे, गोदाम सोडून कोठे जायचे असल्यास जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी, थोडा जरी हलगर्जीपणा केल्यास काळ्या यादीत टाकले जाईल व अनामत रक्कम जप्त केली जाईल, असा इशारा या नोटिसीत जालना येथील कंपनीला देण्यात आला आहे.
#Loksabha
#CCTV
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 13th May 2024 11:39 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 13th May 2024 11:39 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 13th May 2024 11:39 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 13th May 2024 11:39 am
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Mon 13th May 2024 11:39 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Mon 13th May 2024 11:39 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 13th May 2024 11:39 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Mon 13th May 2024 11:39 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Mon 13th May 2024 11:39 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Mon 13th May 2024 11:39 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 13th May 2024 11:39 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 13th May 2024 11:39 am













