कसा लागला अमित भोसले खुन प्रकारणाचा छडा.सातारा पोलिसांचा अटकेपार झेंडा.

मैत्रिणीला फोन करणे पडले महागात.कानून के हात तो लंबे ही होते है
अडीच हजार कि. मी.च्या प्रवासानंतर आरोपी गजाआड अमित भोसले याच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी अडथळ्यांची शर्यत होतीच. अनेकदा प्रवासादरम्यानच काही तरी खावून पुढे प्रवास सुरु असायचा. या दोन ते अडीच हजार कि. मी. चा प्रवास करताना आरोपी अनेकदा मोबाईलचे सीमकार्ड बदलत असायचे त्यामुळे तपास वेगवान होण्यासाठी औरंगाबाद येथे गेल्यानंतर दोन पथके तयार करावी लागली अन विविध दिशेने तपास सुरु केल्यामुळेच अवघ्या आठ दिवसाच्या आतच आरोपी गजाआड करता आले.

सातारा :  कोणताही गुन्हा करताना प्रत्येकजण यामधून आपण सहीसलामत बाहेर पडू, अशी अपेक्षा व्यक्त करत असतो. काही वेळा तो आपल्या कल्पनेप्रमाणे पोलिसांची तपासाची दिशाही बदलत असतो पोलिस म्हणून कामाला आसलेल्या रागिणी भोसले हिला पन तसच वाटल पन कानून के हात तो लंबे ही होते है . सातारा एलसीबी पोलिस पथकाने तीन हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर २४ जानेवारीच्या अमित भोसले गोळाबार घटनेतील आरोपींना अखेर जेरबंद केले.

प्रेम कर भिल्लासारखं... बाणावरती खोचलेल्या...या ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज यांची कविता अजरामर झाली आहे. ती प्रेमिकांमुळेच. या कवितेतील प्रेमिकाला त्याच जिच्यावर प्रेम आहे, ते कळलेच पाहिजे म्हणून अनेक उदाहरणे देत शेवटी भिल्लाच उदाहरण दिलं गेलं. भिल्ल जसा नेम धरुन बाण मारत उद्दीष्ट साध्य करतो अगदी तसंच सातारा पोलिसांनी साताऱ्यात २४ जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारच्या घटनेतील प्रेमाच्या वेडीला कायद्याची बेडीत अखेर अडकवलंच. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी तब्बल अडीच हजार कि. मी. चा प्रवास करत सातारा पोलिसांनी अटकेपार झेंडा लावत गुन्हेगारांना गजाआड केलं. या गुन्ह्याची उकलही झाली ती मैत्रीणीच्या फोनमुळेच. त्यामुळे आरोपीला मैत्रीणीला फोन करणे महागातच पडले.

वाढेफाटानजिक २४ जानेवारी २0२३ रोजी अमित भोसले रा. शुक्रवार पेठ, सातारा याचा पोलिस पत्नी रागिनी भोसले यांनी टोळीला दहा लाखाची सुपारी देवून पतीचा काटा काढला. या घटनेत पोलिस पत्नी रागिनी या शाहुपूरी पोलिस ठाण्यातर्गत मंगळवार पेठ, पोलिस चौकी येथे कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्या पोलिस खात्यातील प्रशिक्षणासाठी धुळे येथे होत्या. घटना घडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन क्षणात पळ काढला. मग त्यांच्या शोधासाठी सातारा तालुका पोलिसांचा शोध सुरु झाला. त्यावेळी या गुन्ह्यातील केंद्रबिंदू सातारा पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना समजला पण आता आव्हान होते ते टोळीतील आरोपींना जेरबंद करणे. पुढे दोन दिवसांनंतर हा तपास एलसीबीच्या पथकाकडे देण्यात आला. 

आता गुन्ह्याची उकल बऱ्यापैकी झाली होती. पण तपास निश्चित करताना सोशल मिडीयाचा वापर होणे महत्वाचे होते. त्यादृष्टीने एलसीबीचे पथक २५ जानेवारी रोजी रात्री पुणे येथे रवाना झाले. २७ रोजी मित्राच्या घरी आरोपींचा शोध घेतला असता तिथे आरोपींच्या टोळीचा तपास लागला नाही. पुढे तपासाची चक्रे वेगवान केली. त्यावेळी हाती बऱ्यापैकी माहिती आली पण तोपर्यंत आरोपींने मध्यप्रदेशमधील उज्जैन गाठलं. आता उज्जेनचा प्रवास करणं निश्चित केलं त्याचवेळी त्या टोळीतील एकजण औरंगाबाद येथे असल्याचे समजले. दरम्यान, औरंगाबाद येथे असलेल्या आरोपीनेही चित्रपटाप्रमाणे कथानक चालू केलं. या गुन्ह्यातील अल्पवयीन याला पुणे येथे हजर करायचं अन तपासाची दिशाच बदलायची, अशी भन्नाट कल्पना चालविली. पण हा आरोपीचा माथा एव्हाना सातारा पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्या अल्पवयीनला ताब्यात न घेता पुढील तपास सुरु ठेवला अन आरोपी गाफील होत गेलं.
औरंगाबाद येथे चाळीसगावच्या सीमेवर जाताच आरोपीने मोबाईलचे सीमकार्डच बदललं. अन नवीन लोकेशन पुणे येथे मिळालं, त्यावेळी सोलापूर नजिक कुर्डुवाडी येथे पोलिस पथक आलं असता पुन्हा नवं लोकेशन लातूरच्या पुढे उदगीर झालं. आता हा प्रवास पुन्हा दूरचा झाला. पण आरोपीपर्यंत जाण्याचे ध्येय्य निश्चित होते. पण सोशल मिडीयाचा वापर करणारे हे आरोपी दर अर्ध्या तासाला नवं सीमकार्ड घेवून प्रवास करत असल्यामुळे त्यांचे लोकेशन पाहण्यासाठी अगदी 'वेनस डे' या हिंदी चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर आणि नसरुद्दीन शहा यांच्या कथानकाप्रमाणे सुरु होते. या चित्रपटात सामान्य नागरिक नसरुद्दीन शहा हे रेल्वेच्या प्रवासात परिचित चेहरा त्यांच्या गैरहजेरीत बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर हरवला अन त्याचा सूड घेण्यासाठी सोशल मिडीयाचा कल्पकतेने वापर केला. याच लोकेशन यामधील मास्टर माईंड यांनाही मिळणं मुश्किल झालं होतं, अगदी असचं काही आरोपींन सुरु केलं होतं. दर अर्ध्या एक तासाला नवं सीमकार्ड घ्यायचं अन पुढील प्रवास सुरु असायच. त्यामुळे तपास प्रक्रियेत अडथळ्याची शर्यत नेहमीच असायची. अनेकदा निराशा यायची पण कोठुन तरी काजवा चमकावा तसं या तपासाला दिशा मिळत असायची. 

या तपासकामातही मुळ घटनेत अमित अन रागिणी हे एकमेकांवर प्रेम करत असायची अगदी असचं आरोपीनेही एका मैत्रीणीबरोबर पिंगा घातला होता. अन दोघेही प्रेमाच्या आणाभाका घेत असायचे. पण त्या मैत्रीणीला याचं उद्योग अजून समजलं नसावं म्हणून ती ही त्याला साथ देत असायची. अन प्रेमाच्या जाळ्यातील अडकलेल्या पाखराभोवती हा ही तिच्याशी संपर्क साधण्यासाठी नवनवीन मोबाईलचं सीमकार्ड बदलत तो तिच्या जवळ कायमच राहिला. अन नेमका हा केंद्रबिंदु निश्चित करत तपासाची दिशा निश्चित केली. पुढे सातारा पोलिस पुन्हा पुणे येथे आले. त्यावेळी त्यामधील एक आरोपी भेटला त्यानंतर त्याला सातारा पोलिसी हिसका दाखवताच त्याने पोपटाप्रमाणे पोपटपंछी सुरु केली. अन मी आहे तर दुसरा अमूक अन तिसरा तमुक ठिकाणी त्यालाही घ्या म्हणून त्याने सांगितल्यानंतर तपासाला गती मिळाली. या घटनेतील इतर आरोपी आपल्या सहकार्यांना तू कुठे, हा कुठे याबाबत नव्या सीमकार्डवरुन माहितीची देवाण-घेवाण करत होते अन याचा क्ल्यू मिळाला त्यावेळी इतर आरोपी गोवा येथे असल्याचे समजलं. अन एलसीबी पथकातील सर्वांनीच पोलिस अधिक्षक यांना याबाबत कल्पना देत गोवा पोलिसांशी संपर्क साधत ते ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याचे लोकेशन सांगितलं. गोव्याची टीमही तात्काळ गेली अन सोशल मिडीयावरुन त्यांनीही आरोपींचे चेहरे पाठवताच शिक्कामोर्तब करताच सर्वांना जेरबंद केलं.

एलसीबीच्या पथकाचे विशेष कौतुक

अमित भोसले गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यापूर्वी एलसीबीच्या पथकाने ते गोवा येथे असल्याबाबतची माहिती दिली. त्यावेळी तात्काळ गोवा येथील एसपी यांच्याशी संपर्क केला. अन त्यांच्या विशेष पथकाने या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केलं. या तपासकामी सातारा एलसीबीच्या पथकास या गुन्ह्याची उकल लवकर करता आल्याबद्दल त्यांना प्रोत्साहनपर ॲर्वाड देवून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. आता या सर्व आरोपीबाबतचे अजून सबळ पुरावे मिळण्याबाबत एलसीबीच्या टीमला सूचना केल्या आहेत.......     -समीर शेख, पोलिस अधिक्षक, सातारा.

 

 

एलसीबीची टीम ठरली हिरो

अमित भोसले गोळीबार प्रकरणातील गुन्ह्याची उकल अवघ्या आठ दहा दिवसांत करत एलसीबीची टीमच ठरली हिरो. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर अधिक्षक बापू बांगर, डीवायएसपी मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, विश्वजीत घोडके, सपोनि रमेश गर्जे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, नीलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयुर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम, सातारा तालुका पोलिस ठाणेतील पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलिस अंमलदार राजेंद्र वंजारी, दादा परिहर, नितीराज थोरात, सतीश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहुल राऊत यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला