पोलिसांनी उंचीवरुन त्याच्या मुसक्या आवळल्या...

सातारा : शहर डी.बी पथकाने सोमवारी वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आणि सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद ठेवली. हा निरोप मी सव्वा पाच वाजता ग्रुप वर वाचला. मग मोठी कारवाई असणार असा विचार करत थेट पोलीस मुख्यालयात पोहचले. 

बघते तर काय ? दुचाकी, चारचाकी, टेम्पो अशा वाहनांची रांग लागली होती. 

तेथेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सर पण उभे होते. सरांशी वाहन चोरी च्या कारवाई बद्दल बोलू लागले. एक एक करत पोलीस अधिकारी, कर्मचारी आमचे वरिष्ठ पत्रकार ही आले. आणि गुन्ह्याची उकल कशी केली हा प्रश्न एक एक असे आम्ही विचारु लागलो...

पोलीस अधिकारी म्हणाले, नागेश शिंदे असे या वाहन चोराचे नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील इंचलकरंजी आहे. शिक्षण दहावी झाली. घरची परिस्थिती बेताचीच आहे. वाहने चोरी करुन तो दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन विकायचा. काही वाहनाचे पार्ट काढून विकायचा. वयाच्या 18 वर्षापासून तो वाहने चोरत आहे. एका मागून एक असे वाहन चोरीचे त्याच्यावर 29 गुन्हे दाखल आहेत.

  फक्त सातारा शहर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे 17 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत,  हे ऐकून आश्चर्य वाटले...

तो मध्यरात्री रेल्वेने येवून मोटर सायकल चोरुन न्यायचा.      प्रत्येक जिल्ह्यात त्याने एक खूनगाठ बांधून ठेवली होती. यावरुन तो कोणत्या जिल्ह्यात आहे हे त्याला कळायचे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर मोबाईचा वापर करायचा. वाहन चोरताना सीसीटीव्हीत चेहरा दिसू नये म्हणून चेहऱ्यावर रुमाल बांधायचा...

हे ऐकून चोर किती शातीर आहे. असा विचार मनात येऊन गेला...

मग तपास कसा केला हा प्रश्न आवर्जून अधिकाऱ्यांना विचारला. पोलीस अधिकारी म्हणाले, फक्त उंचीवरुन...

काय ? हे ऐकून आश्चर्य वाटले. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक राज्यातील पोलीस त्याचा शोध घेत होते पण शहर डी.बी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या हे ऐकून  आनंद वाटला.

खरंच...
कोणताही चोर चोरी करताना पोलिसांच्या नजरेत येणार नाही याची पूर्ण काळजी घेत असतो. यासाठी तो अनेक पद्धती वापरत असतो. मात्र त्याने कोणती पद्धत कशी वापरली. तो कचाट्यात कसा सापडेल, यासाठी पोलीस त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेऊन असतात. हे या कारवाईतून शहर डी.बी पथकाने दाखवून दिले. 

हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. गुन्हेगारीचे बीट बघताना असे अनेक अनुभव माझ्या लेखनीतून मला नक्की मांडता येतील यात शंकाच नाही...!

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त