कोयना वसाहत परिसरात धुमाकूळ घालणारी ती दोन लाल तोंडाची माकडे अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात

कोयना वसाहत व परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निष्वास..
कोयना वसाहत मध्ये दोन लाल तोंडाच्या माकडानी अक्षरशः धुमाकूळ घातला होता ही दोन माकडे लोकांच्या अंगावर धावून जाणे त्यांना जखमी करणे दुकानातून घरातून खाद्यपदार्थ हिसकावून घेऊन जाणे झाडांचे चार चाकी गाड्यांचे नुकसान करणे असे प्रकार करत होते..

सातारा न्यूज /कराड ; गेली अनेक दिवस कोयना वसाहत मध्ये दोन लाल तोंडाच्या माकडानी अक्षरशः धुमाकूळ घातला होता ही दोन माकडे लोकांच्या अंगावर धावून जाणे त्यांना जखमी करणे दुकानातून घरातून खाद्यपदार्थ हिसकावून घेऊन जाणे झाडांचे चार चाकी गाड्यांचे नुकसान करणे असे प्रकार करत होते.. दरवाजा उघडा दिसला की घरात घुसणाऱ्या या माकडांमुळे कोयना वसाहत मधील नागरिक वैतागले होते

याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर कोयना वसाहत ग्रामविकास अधिकारी हिनुकले पोलीस पाटील फिरोज मुल्ला यांनी याबाबत वनविभागाला सांगितल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रमेश जाधवर योगेश बेडेकर भरत पवार पोलीस पाटील फिरोज मुल्ला तसेच रेस्क्यू टीमचे हर्षद सर कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाघमारे आणि अमोल यांनी चार तास अथक परिश्रमाने त्या  रेस्क्यू ऑपरेशन करून त्या दोन लाल तोंडांच्या माकडांना जेरबंद केले व त्यांना कोयना जंगल परिसरात सोडून देण्यात आले या टीमने केलेल्या कामगिरीबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त