मोफत शैक्षणिक सहलीसाठी निनाम येथील सहा विद्यार्थ्यांची निवड

देशमुखनगर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगरुळ येथील शैक्षनिक सहलीसाठी निनाम जिल्हा परिषदेच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून हे विद्यार्थी अभ्यास सहली साठी गेले आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये ज्या विद्यार्थिनी सातारा जिल्हा मध्ये सर्वोत्तम गुणवत्ता प्राप्त केली आहे अशा विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन केंद्र बंगळूर (इस्त्रो) येथे अभ्यास सहलीसाठी जाण्याची मोफत संधी मिळाली आहे. यामध्ये निनाम जि. प. शाळेतील आदर्श घोरपडे, पूजा महाडिक , अनन्या जाधव ,मनस्वी जाधव ,समर्थ कदम , पूर्वा पवार या सहा गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली. या सहली मुळे विद्यार्थ्यानं मध्ये वैज्ञानिक गुणवत्ता वाढीस लागेल तसेच भावी वाटचालीस प्रोत्साहन मिळणार आहे ,असे मत शाळेचे मुख्यादापक रविंद्र साळुंखे यांनी व्यक्त केले.सर्व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य, व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त