कृषी दुकानातून सॅम्पल मालाची रोखीने विक्री सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेकून मनमानी लूट

शिवथर :  कोरेगाव तालुक्यातील आंबवडे संमत वाघोली या ठिकाणी कृषी दुकानातून करपा आणि तांबरा या रोगावरील औषध संबंधित दुकानातून खरेदी केले दुकानदाराने जीएसटी सहित बिल देऊन सॅम्पल माल विकत दिला शेतकऱ्यांनी घरी आल्यावर औषधाच्या बाटलीची किंमत पाहिली असता त्याच्यावर नोट फोर सेल असे लिहिले होते संबंधित दुकानदाराला शेतकऱ्यांनी विचारणा केली असता तुम्हाला नको असेल तर ती बाटली माघारी आणून द्या असे दुकानदाराने सांगितले
अंबवडे संमत वाघोली तालुका कोरेगाव या ठिकाणावरील आंबवडे चौकात खते आणि बी बियाणे यांचे कृषी छाया कृषी सेवा केंद्र या नावाचे दुकान आहे संबंधित शेतकरी शनिवारी अकराच्या दरम्यान दुकानांमध्ये गेला आणि करपा आणि तांबडा या रोगावरील आम्ही स्टाटॉप नावाचे औषध खरेदी केले परंतु संबंधित दुकानदाराने सॅम्पल ला ठेवलेले औषध ते रोखीने विकल्याने सरळ सरळ दुकानदार शेतकऱ्यांची डोळेझाक करून मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याचे दिसून येत आहे संबंधित त्या औषधाच्या सेल्स मॅनेजरला विचारणा केली असता त्याने देखील दुकानदाराची बाजू घेत नजरचुकीने विक्री केले असेल असे सांगण्यात आले परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांची या पद्धतीने लूट होत आहे त्याला पंचायत समिती कोरेगाव येथील कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कृषी छाया कृषी सेवा केंद्र अंबवडे फाटा या दुकानावर कारवाई होणार का? असाही सवाल सर्वसामान्य जनतेमधून होत आहे तसेच संबंधित दुकानदारावर कारवाई होऊन माल विक्रीचे लायसन रद्द केले जाणार का? याबाबत शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे

 


आज माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याची अशा पद्धतीने दुकानदार फसवणूक करत आहेत तर यांच्यावर कारवाई होऊन संबंधित दुकानदाराचे लायसन रद्द करण्यात यावे
निलेश साबळे शेतकरी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला