सातारा पोलिसांचा सूर्या श्वान देशात अव्वल ! अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सन्मान
Satara News Team
- Fri 21st Feb 2025 08:22 am
- बातमी शेयर करा
सातारा: झारखंड रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलिस बीडीएस पथकातील श्वान सूर्याने एक्सप्लोझिव्ह इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पोलिस व सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रांची येथील पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये देशातील २८ राज्य, स्पेशल फोर्सेस व केंद्रशासित प्रदेश असे मिळून एकूण ४४ संघांनी सहभाग नोंदविला होता.
एक्सप्लोझिव्ह इव्हेंट विभागात लगेज सर्च, ग्राऊंड सर्च, कार सर्च, फूड रेप्यूजन आणि आज्ञाधारकपणा अशा प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. सातारा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात श्वान सूर्या याने प्रथमच एक्सप्लोझिव्ह विभागात सुवर्णपदक प्राप्त करून सातारा पोलिसांचे नाव देशात उंचावले.
श्वान सूर्या हा अतिशय हुशार व कर्तव्य तत्पर अज्ञाधारक श्वान आहे. त्याचे हॅन्डलर म्हणून पोलिस हवालदार नीलेश दयाळ, सेकंड हॅन्डलर सागर गोगावले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस यांनी त्यांचा सत्कार केला.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 21st Feb 2025 08:22 am
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 21st Feb 2025 08:22 am
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 21st Feb 2025 08:22 am
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 21st Feb 2025 08:22 am
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Fri 21st Feb 2025 08:22 am
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 21st Feb 2025 08:22 am
संबंधित बातम्या
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
सुरुचि महिला ग्रंथालय कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
पुसेसावळीतील अतिक्रमणला जबाबदार बेरजेचे राजकारण कि राजकीय दबावातील प्रशासन?
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
मलवडी येथील खंडोबा देवाचा 1 डिसेंबरला रथोत्सव..
- Fri 21st Feb 2025 08:22 am
-
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी सुट्टी
- Fri 21st Feb 2025 08:22 am












