हिंदी महामंडळाच्या निबंध लेखन स्पर्धांचे निकाल जाहीर
Satara News Team
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा : महाराष्ट्र राज्य व जिल्हा हिंदी शिक्षक महामंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.अशी माहिती राज्य उपाध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी दिली.
हिंदी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये श्री. विश्वासराव भाऊ विद्यालय, चिखली. ता. शिराळा जि. सांगली येथील उदयकुमार गवळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.श्री म्हाळसाकांत विद्यामंदिर ,पाल ता. कराड जि. सातारा येथील रवींद्र बागडी व बाळासाहेब देसाई हायस्कूल, वायफळे ता.तासगाव जि. सांगली येथील ज्योती कोगनोळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय ,फुलगाव ता. हवेली जि.पुणे येथील आनंद जगताप व मा.वि. व ज्युनिअर कॉलेज,शेळोली ता. गगनबावडा जि. कोल्हापूर येथील वसंत कुंभार यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे.परीक्षक म्हणून प्रा.डॉ. सुवर्णा यादव, सुधाकर माने व सौ.सुनंदा शिवदास यानी काम पाहिल हिंदी मंडळाच्या जिल्हास्तर शिक्षक निबंध लेखन स्पर्धेत विकास लादे व पुनम गुरसाळे प्रथम : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने बारावीपर्यंतच्या हिंदी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल अंबवडे (कोरेगाव) येथील विकास लादे व पुनम गुरसाळे(सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल, सातारा) यांनी प्रथम क्रमांक संयुक्तपणे पटकावला आहे. मंडळाचे पूर्व अध्यक्ष कै.एम. आर. शिंदे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संभाजीनगर सातारा येथील राष्ट्रभाषा भवनमध्ये पार पडलेल्या निबंध स्पर्धेमध्ये २७ शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील अन्य क्रमांकाचे मानकरी : द्वितीय क्रमांक विभागून - सुषमा माने (रोटरी प्राथमिक शाळा, मलकापूर) व चव्हाण सुभाष (न्यू इंग्लिश स्कूल, पोगरवाडी) तसेच तृतीय क्रमांक विभागून : विजय साळुंखे, (गोपाळकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द) व सीमा कुंभार (महाराजा शिवाजी हायस्कूल, कुडाळ) चौथा क्रमांक - अमृता भोसले (हर्षिताराजे इंग्लिश मिडीयम स्कूल,औंध),पाचवा क्रमांक - नेताजी ननावरे (अजिंक्यतारा माध्यमिक विद्यामंदीर, शाहूनगर - शेंद्रे) यांना देण्यात आला.या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. वैशाली शिंदे, शाहनवाज मुजावर व शि. रा. खामकर यांनी काम पाहिले याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी,उपाध्यक्ष शिवाजीराव अडसूळ,जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी, उपाध्यक्ष इकबाल मुल्ला,पुरुषोत्तम पगारे,विठ्ठल शिंदे,संजय गावडे, आ.तू.पाटील, सुरेश कोडग, शिवाजी कोकाटे,राजाराम टपळे,नारायण शिंदे, सुधाकर माने, कार्यवाह, अनंत यादव, पतसंस्था अध्यक्ष हणमंत सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 7th Dec 2022 04:57 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 7th Dec 2022 04:57 pm













