खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला गलांडे ७५ हजार रुपयांची लाच घेताना जाळयात.
Satara News Team
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
- बातमी शेयर करा

खंडाळा : खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला अशोक गलांडे (वय ४७, रा. समर्थ प्लाझा, पुणे) व युवा रोजगार कौशल्य योजनेतील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर मंगळवारी साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून धडक कारवाई करत ७५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यांच्यावर खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत या विभागाच्या पोलिस अधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिलेली माहिती अशी, की लोणंद (ता. खंडाळा) येथील सिटी सर्व्हे नंबर १७७/४२८ चे क्षेत्रफळ १८१.४० चौरस मीटर या मिळकतीवर चुकून लागलेला सत्ता प्रकार ‘ब’ कमी करून मिळण्याबाबत वाई येथील प्रांताधिकाऱ्यांना लेखी अर्ज सादर केला होता.
त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालय खंडाळा येथे पाठविला.  तहसील कार्यालय खंडाळा यांनी चौकशीसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, खंडाळा येथे चौकशी व अभिप्रायाकरिता पाठविला होता. दरम्यान, उपअधीक्षक (भूमी अभिलेख) श्रीमती ऊर्मिला गलांडे यांनी तक्रारदार यांच्या मिळकतीवरील सत्ता प्रकार ‘ब’ कमी करून सत्ता प्रकार ‘अ’ करण्यासाठी चौकशी अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी ७५ हजार रुपये लाचेची रक्कम ही कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप यांच्याकडे देण्यास सांगितले.
कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी उमाप यांनी उपअधीक्षक गलांडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदारांकडून लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सापळा पथकाचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस हवालदार नितीन गोगावले, पोलिस विक्रमसिंह कणसे, स्नेहल गुरव व अजित देवकर यांनी ही कारवाई केली.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
संबंधित बातम्या
-
कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
कराड तालुक्यात राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Wed 23rd Oct 2024 10:37 am
-
प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
- Wed 23rd Oct 2024 10:37 am