यात्रेत बंदुकीतून हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा; कऱ्हाड तालुक्यातील घटना
Satara News Team
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
- बातमी शेयर करा
कराड : गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. जखीणवाडी (ता. कराड) येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
योगेश तानाजी थोरात, अधिकराव निवृत्ती पवार, वसंत दाजी पाटील (सर्वजण रा. जाखीणवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. यावेळी गावातून बैलगाड्या पळविल्या जातात. या यात्रेला विभागात मोठे महत्त्व आहे. शनिवारी सकाळीही परंपरेनुसार गावात रंगोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, उत्सव सुरू असतानाच हवेत गोळीबार झाल्याचा आवाज काही पोलिस कर्मचाऱ्यांना आला. त्यांनी शोध घेतला असता तिघांनी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी हवेत गोळीबार करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील बारा बोअरची बंदूकही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 1st Apr 2024 02:00 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 1st Apr 2024 02:00 pm












