खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी एलसीबीकडून जेरबंद
कोमल पवार /वाघ
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
- बातमी शेयर करा
सातारा : खूनाच्या गुन्हयामध्ये तीन वर्षापासुन फरारी असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. दऱ्या खटपटया भोसले (रा.मालगांव ता.जि. सातारा) असे या आरोपीचे आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून हव्या असलेल्या आरोपींची विशेष शोध मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार दऱ्या भोसले हा वाई तालुक्यातील जांब येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्हयातील गुन्हयांमध्ये पाहिजे असलेले व फरारी आरोपी पकडण्याबाबत दिनांक २६/१२/२०२२ ते दिनांक ०९/१/२०२३ पर्यन्त विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले आहे. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली विशेष पथक तयार केलेले आहे. दिनांक ७/९/२०२३ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना बातमी प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील खूनाच्या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी दऱ्या खटपटया भोसले रा.मालगांव ता.जि. सातारा हा जांब ता. वाई जि. सातारा येथे येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी विशेष पथकास नमुद ठिकाणी जावून आरोपीस पकडून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विशेष पथकाने जांब गांवी जावून त्याचा शोध घेतला, विशेष पथकातील पोलीसांना नमुद आरोपी पाहिल्याने तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पाठलाग करुन पकडले आहे. आरोपीस पुढील कारवाईकरीता कोरेगांव पोलीस ठाणे गुरनं २१४/२०२० भादंवि कलम ३०२ वगैरे या गुन्हयाच्याकामी कोरेगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विश्वनाथ संकपाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 9th Jan 2023 03:56 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 9th Jan 2023 03:56 pm











