साताऱ्यातील वाढे गावात देशी गाईचं डोहाळ जेवण घालून अनोखा संदेश

गाईचे महत्व समजलेल्या हेमंत नलावडे यांची माऊली ही गाई त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. याच गाईचं त्यांनी डोहाळ जेवण घातलं आहे

सातारा : आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गाईवर करतो. याचं उत्तम उदाहरण साताऱ्यातील वाढे गावात पाहायला मिळाले. या गावातील हेमंत नलावडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाने आपली खिलार जातीची लाडकी गाई 'माऊली' हिचे डोहाळ जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे.

गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे देशी गाईचे दूध लहान मुलांसाठी अमृतासमान असते. तसंच देशी गाईचे गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गाईचे महत्व समजलेल्या हेमंत नलावडे यांची माऊली ही गाई त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. यामुळे गाईचे डोहाळ जेवण करण्याचा या परिवाराने निर्णय घेतला.

शेतकऱ्यांना देशी गाईचे महत्व समजावे, हा उद्देश नलावडे परिवाराचा आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाले होते. माऊली या गाईची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग गोडधोड खायला घालून तिला ओवाळण्यात आले. या कार्यक्रमाला नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले

दरम्यान, नलावडे कुटुंबाने शेतकऱ्यांना देशी गाईचं महत्व समजावे, यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त