आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे कोतवालांच्या मानधनात वाढ

सातारा :  गाव पातळीवर शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणजे कोतवाल असतो. कोतवालांननी कोरोना काळात जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून उत्तमरित्या कामकाज पार पाडले. या कोतवालांना समान काम समान वेतन या धर्तीवर मानधन वाढ झाली पाहिजे यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोतवालांना १५ हजार रुपये मानधन लागू केले. मानधनात वाढ करून दिल्याबद्दल कोतवाल संघटनेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सत्कार करून आभार मानले.

महसूल विभागाचा कान, नाक, डोळे म्हणून प्रशासन व जनता यामधील दुवा कोतवाल अत्यंत महत्वपूर्ण समजला जातो. कोतवाल विविध योजना सर्व शेतकरी, मजूर, सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे योग्य पद्धतीने काम करतो. गौण खनिज चोरीला आळा बसविणे, नोटीस बजावणी, निवडणुकीची सर्व जबाबदारी पार पाडणे, लसीकरण मोहीमेला योग्य सहकार्य करणे. जन्म मृत्यु नोंद करणे, महसूल गोळा करणे, सभा बोलावण्याची संपूर्ण व्यवस्था करणे आदी कामे कोतवालामार्फत होत असतात. कोतवालांच्या मानधनवाढीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान कोतवाल राज्य संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद देवणे, राज्य सल्लागार रोशन जोगे, राज्य सचिव कृष्णा शिंदे, राज्य सदस्य सागर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मानधन वाढ करण्यासाठी पाठपुरावा करू, त्यामुळे संप मागे घ्या असे आवाहन केले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आवाहनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले होते.

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोतवाल यांना समान काम समान वेतन या धर्तीवर एकसमान १५ हजार रुपये मानधन लागू केले आहे.राज्यात एकूण १२,६३७ कोतवाल आहेत.  त्यापैकी ८,८०१ कार्यरत आहे. मानधन वाढीने सामान्य कोतवाल यांना दीलासा मिळाला आहे. मानधनाचा प्रश्न सोडविल्याबद्दल कोतवाल संघटनेच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश काशीद, सतीश बोडरे, दीपक इंगवले, विशाल भोसले, सुदर्शन चव्हाण, प्रमोद झुंजार, सतीश खाडे, संजय भंडलकर, भरत पवार, समाधान सुतार, संतोष मोहिते, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त