कोरेगाव उत्तर भागात गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

सामान्य ग्राहकांना धरले जाते वेठीस; घरपोच सेवेसाठी घेतले जातात जादा पैसेसामान्य ग्राहकांना धरले जाते वेठीस; घरपोच सेवेसाठी घेतले जातात जादा पैसे

        सध्या या ना त्या कारणाने महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून गेला आहे. सततच्या महागाईने महिलांना घरातील महिन्याचे बजेट जुळवता जुळवता तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी भाजीपाला महाग, तर कधी पेट्रोल-डिझेल; कधी धान्य महाग, तर कधी शाळेची फीवाढ. यामुळे सर्वसामान्यांना महागाईने सळो की पळो करून सोडले आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घरगुती वापराचा गॅस सिलिंडर. त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र शासनाने आणि संबंधित गॅससिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा गॅस सिलिंडर वितरक ३० ते ४० रुपये जास्त घेत आहेत. आर्थिक लुबाडणूक होत असल्याने ग्राहक कमालीचे त्रासले आहेत. याबाबत दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.कधी तरी महागाई कमी होईल, याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. मात्र महागाई कमी होण्याचे चिन्ह काही दिसत नाहीत. पेट्रोल व डिझेलने कमालीची उंचाई गाठली असल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यातून कधी सुटका होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या गॅसवर झाला आहे. सध्या घरगुती वापराच्या गॅसचा दर १०६५ रुपये इतका आहे.सध्या ग्रामीण भागात गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात पूर्वीपेक्षा अनेक एजन्सी कार्यरत आहेत.तसेच कोणतीही सुरक्षेची काळजी नघेता गॅस सिलेंडर किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवले जात आहेत.त्यामध्ये सर्वच एजन्सी ३० ते ४० रुपये जास्त आकारले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लूट सुरू आहे. तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.संबंधित एजन्सीकडे तक्रार केली, तर उलट ग्राहकांनाच डोळ्यावर धरत त्याला सिलिंडर मिळण्यास कसा त्रास होईल, असा प्रयत्न केला जातो. त्यामुळे काही ग्राहक गॅस सिलिंडरसाठी जास्तीची रक्कम मोजत आहेत.संबंधित गॅस वितरकांकडून ग्राहकांना सिलिंडर घरपोच देण्यासाठी सर्रास टाळाटाळ केली जाते. एखाद्या ग्राहकाने आगाऊ रक्कम देण्यास मनाई केली, तर त्याला सिलिंडर दिला जात नाही. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. पावतीपेक्षा मूॅँहमांगी किमत मागून ग्राहकांना लुटण्याचा गोरखधंदा सध्या गॅस वितरकांनी सुरू केल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.काही वेळा आगाऊ रक्कम ही डिलेव्हरी चार्जेस असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग संभ्रमात आहे. गॅस वितरक कंपन्या म्हणतात की कुठल्याही प्रकारचे चार्जेस देऊ नये किंवा पावतीपेक्षा एक पैसाही जास्त देऊ नये. असे असतानाही आगाऊ रक्कम घेण्याचे धाडस ही मंडळी कशी काय करीत आहेत, याचे कोडे अनेकांना सुटत नाही.तसेच गॅस एजन्सी कडून कोणतेही पावती दिली जात नाही. एका ग्राहकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदान दरात दिले जातात. म्हणजे एका ग्राहकाकडून वर्षाकाठी रुपये ४०० ते ५०० जास्त घेतले जात आहेत. ही लूट का, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.


काय आहे नियम?-

सिलिंडर ग्राहकाला घरपोच देणे किंवा ग्राहकाने संबंधित वितरकाच्या गोदामातून घेऊन जाण्याचा पर्याय आहे. ग्राहक स्वत: गोदामातून सिलिंडर घेणार असल्यास त्याने त्याबाबत अर्ज देणे आवश्यक आहे. ग्राहकाला घरपोच सिलिंडर देण्याच्या सेवेसाठी २० रुपये प्रति सिलिंडर शुल्क आकारण्यात येते. गॅस एजन्सी सिलिंडर घरपोच देत नसल्यास हे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. सिलिंडर घेण्यासाठी संबंधित वितरकाच्या गोदामात ग्राहक गेल्यास वितरकाकडून २० रुपये संबंधित ग्राहकास देणे बंधनकारक आहे किंवा सिलिंडरच्या शुल्कातून ती रक्कम वजा करणे आवश्यक आहे. असे असले, तरी सामान्य ग्राहकांना याची माहिती नसते.



पैसे न दिल्यास येथे करा तक्रार-
   
ग्राहकाने स्वत: गोदामातून सिलिंडर घेतल्यास त्याला वितरकाने २० रुपये परत करणे आवश्यक आहे. वितरक ही रक्कम देण्यासाठी नकार देऊ  शकत 
नाही. तसे केल्यास १८००२३३३५५५ या क्रमांकावर ग्राहक तक्रार करू शकतात. सध्या ग्राहकांना एका वर्षात १२ अनुदानित सिलिंडर दिले जातात. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावा लागतो.पाच किमीपर्यंत मोफत घरपोच सेवावितरकाच्या गोदामापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या ग्राहकांना मोफत घरपोच सिलिंडर पुरवठा करण्याची सेवा देणे बंधनकारक आहे. असे असतानाही प्रत्येक ग्राहकाकडून पैसे घेतले जात आहेत. वितरकाने दिलेल्या पावतीपेक्षा जास्त रकमेची मागणी करत असेल, तर टोल फ्री क्रमांकावर त्याबाबत तक्रार करता येते.



सध्या मोठ्या प्रमाणात महागाईने आम्हा सर्वसामान्यांना हैराण केले आहे. त्यात भर म्हणजे रोजच लागणाऱ्या गॅस सिलिंडरची. या सिलिंडरच्या पावतीवर नमूद केलेल्या रकमेपेक्षा तीस ते चाळीस रुपये जास्तीचे घेतले जात आहेत. जास्तीची रक्कम देण्यास नकार दिला, तर पुन्हा सिलिंडर देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आमच्याकडे पर्याय नाही.- 
 गृहिणी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त