सेनाँर चौकात कोयत्याने हल्ला, हल्ल्यात इर्टिका गाडीचे नुकसान,हल्लेखोर फरार ; परिसरात खळबळ
Satara News Team
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राधिका रोड येथील सेनाँर चौकात शनिवारी आठ वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात इर्टिका गाडीचे नुकसान झाले असून हल्लेखोर पसार झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. शाहूपुरी पोलिसांनी घटना पोहचून पंचनामा सुरु केला. रात्री उशीरापर्यंत माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शहरातील राधिका रोड येथील सेनाँर चौकात सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताकडून कोयता नाचवून दहशत निर्माण करण्यात आली. यावेळी इर्टिका कार वर हल्ला करत नुकसान करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसारात खळबळ उडाली. हल्ला करुन अज्ञात टोळीने पळ काढला. तर या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्याची गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करत कार ताब्यात घेतली. या हल्ल्यात कोणी जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र कारचे नुकसान झाले आहे.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
सेनाँर चौकात अज्ञातांनी हल्ला करुन गाडीचे नुकसान केले. या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी तपासानंतर माहिती देणार असल्याचे सांगितले. परंतु सर्वत्र ही घटना वा-यासारखी पसरल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 1st Jul 2023 09:46 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 1st Jul 2023 09:46 pm











