पोलिस पत्नीनेच केला अमित भोसलेंचा खुन, अमित भोसले खुन प्रकारण उघड पाच जणांच्या साथीने केला खुन

सातारा : साताऱ्यात वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचा त्याच्याच पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याचा गुन्हा उघड करण्यास सातारा पोलिसांना यश आले आहे.या घटनेने सातारा पोलीस दलासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.पती अमित भोसले याने बाहेरील महीलांशी अनैतिक संबंध ठेऊन मारहाण केल्याच्या रागातून सातारा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पत्नीने त्याच्या खुनाचा कट रचला.दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेल समोर अमित भोसले आणि त्याची मैत्रीण जेवण करण्यासाठी थांबले होते. यावेळी अचानक येऊन दोन अज्ञात तरुणांनी अमितचा खून केला.अमितच्या डोक्यात गोळ्या झाडून आणि गळा चिरून संशयित आरोपी यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी सातारा पोलिसांनी दोन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर आठ दिवसानंतर गोवा राज्यात खून करणाऱ्या पाच आरोपींना पोलीसांनी पकडले आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले. खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव रागिनी भोसले असं असुन या  महिलेसह पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहा आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

यातील काही आरोपी पुण्यातील असुन बाकी आरोपी साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिली. पत्नीला मयत अमित भोसले सतत त्रास देत होता. सतत भांडणं होत होती आणि त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याच कारणातुन मयत अमित भोसले याच्या पत्नीने त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढे फाट्याच्या एका टपरीजवळ गाडीत बसून नाष्टा केल्यानंतर हात धुवत असताना दोन हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. अमित याच्यावर हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चार गोळ्या झाडल्या गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमित भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. अमित भोसले यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला