औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे पीएम स्किल रन उत्साहात संपन्न...

PM Skill Run at Industrial Training Institute, Satara concluded with enthusiasm...

सातारा  : विश्वकर्मा जयंती निमित्त आज देशभरातील आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम स्किल रन आणि दिक्षांत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते... दोन्ही कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसाद आणि उत्साहात पार पडले.
      सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घाडगे साहेब, शाहूपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक फडतरे साहेब आणि संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर साहेब यांनी स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे अकराशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता. यात मुलींमध्ये मिताली बोराटे, किरण गुरव आणि शिवानी बडेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलांमध्ये सुरज साळुंखे, अजिंक्य सपकाळ आणि आदित्य चव्हाण यांनी बाजी मारली. विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली... या स्पर्धेसाठी गट निदेशक सर्वश्री धनंजय हेंद्रे, बोराटे सर, रियाझ शेख, साबळे सर, भिंगारदेवे सर, गोसावी सर, उद्धव इंगवले, चिंतामणी काटवटे, पांडुरंग बगाडे, श्रीधर पवार, विजयकुमार शिंदे, प्रशांत हातागळे, प्रदिप शिंदे, संभाजी मिस्त्री, जगन्नाथ देटके, दिपक चव्हाण तसेच महिलांची रन यशस्वी करण्यासाठी वैशाली इंगवले, रूपाली निकम, अमृता भालेराव आणि कामिनी हिरवे मॅडम यांचे सहकार्य लाभले...


    त्यानंतर लगेचच कौशल्य विकास विभागातील राष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संस्थेच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर यांनी केले. संस्था  जिल्ह्यातील आणि देशातील कौशल्य विकास क्षेत्रात नावारूपास येत असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. 
    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विजय धायगुडे साहेब आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी देशमाने साहेब उपस्थित होते. दोघांनीही आपल्या मनोगतात सर्व पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.


प्रत्येक व्यवसाय निहाय गुणवत्ताप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नोकरीसाठी जापान येथे निवड झालेला हर्ष बांबरस आणि अमिन आत्तार यांनाही सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार शिंदे आणि शशिकांत सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पाटोळे यांनी केले.
   संस्थेतील सर्व गटनिदेशक, निदेशक,कार्यालयीन कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास मौलिक योगदान लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त