चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा
कराड न्यायालयाचा निकाल ; रूवलेतील पीडितेच्या कुटुंबाला एका वर्षात न्यायSatara News Team
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
- बातमी शेयर करा
कराड : चॉकलेटचे अमिष दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारापत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने निकाल दिला. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षात प्रथमच न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी ‘तरूण भारत'शी बोलताना व्यक्त केले. सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष थोरात हा 29 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या गावातील एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रूवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर तिथे जबरदस्तीने बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिला. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत संशयिताला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 21st Jul 2023 07:49 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 21st Jul 2023 07:49 pm












