पैसे न दिल्याने साताऱ्यातील एका डेव्हलपर्सच्या कार्यालयात तोडफोड

सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथे असलेल्या विसावा ग्रुप बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यलयाची दोघांनी तोडफोड केली आहे. पैसे न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे. याप्रकरणी अभयसिंह भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन श्रीरंग यादव (रा. खेड, ता. सातारा) व त्याच्यासोबत एक जण विसावा ग्रुपच्या ऑफिसमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गेले. नितीन यादव यांना अभयसिंह विलासराव भोसले (वय ३४, रा. पिरवाडी, ता. सातारा) यांनी पैसे दिले नाहीत. याचा राग मनात धरून ऑफिसमधील थ्रीडी मोडेल बिल्डींगची पुर्णपणे मोडतोड केली.

स्लायडिंगच्या सहा खिडक्या फोडून सुमारे ६ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी अभयसिंह भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त