श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

रहिमतपूर : ज्ञानाला विकासाची साथ देत सुसंस्कार घडवणाऱ्या श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी प्रख्यात व्याख्याते व शिवसेना उपनेते मा . प्रा. नितीन बानुगडे पाटील व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रसिद्ध लेखक मा. जगन्नाथ शिंदे लाभले.
   समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा  सौ. आशा शिवाजी भोसले होत्या. तसेच मा.डॉ. विवेक क्षीरसागर
 माजी व्यवस्थापकीय संचालक कात्रज दूध डेअरी पुणे व मा. अंकुश भोसले ,अध्यक्ष कै. पै. बाबुराव गणपतराव चव्हाण व्यायामशाळा रहिमतपूर यांची विशेष उपस्थिती होती.
       या शिक्षक दिनाच्या औचित्य साधून श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ .सुमन परशराम फडतरे माध्यमिक प्रशालेमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते 'अद्ययावत संगणक कक्ष' उद्घाटन मा. आमदार दिवाकर रावते यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमामधून उपलब्ध शैक्षणिक टॅबचे वितरण व टेरेस सेंद्रिय पोषण बाग यांचा शुभारंभ करण्यात आला.
        समारंभाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी शिक्षकांच्या हातात देशाची उत्तम पिढी घडवण्याच्या सामर्थ्य असते असे प्रतिपादन केले. शिक्षक विद्यार्थी व समाज घडवतात. शिक्षकाला समाजाचा पाठिंबा असल्यास राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते .शिक्षक हे संस्कारदूत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विज्ञान कितीही पुढे गेले तरीही शिक्षकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले

        राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक मा. जगन्नाथ शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी प्रशालेच्या परिसरातील बोलक्या भिंतींचे कौतुक केले . तसेच टेरेस बाग यामुळे मुलांच्या मनावर सेंद्रिय शेतीचे संस्कार केले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. माणूस हा जेवढा निसर्गाच्या सानिध्यात राहतो तेवढाच तो सुखी, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो असे त्यांनी सांगितले
        मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते संस्थेच्या श्री कोल्हेश्वर विद्यालय तांदुळवाडी मंगळापूर, सौ सुमन परशराम फडतरे  माध्यमिक प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रशाला रहिमतपूर, न्यू इंग्लिश स्कूल चंचळी व गुरुकुल अकॅडमी रहिमतपूर येथील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, निदेशक तसेच संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक व सेवक यांचा डॉ. विवेक क्षीरसागर यांचे 'विवेक विचार' हे पुस्तक व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
      या समारंभासाठी दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार व राज्य पुरस्कार प्राप्त अभिनेते मा.धनराज जगताप उपस्थित होते . तसेच श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.अरुण माने , सहसचिव मा.किरण भोसले , संचालक मा. रामराव मतकर मा.भगवानराव जाधव , मा. गुलाबराव गायकवाड,  मा. सुरेखा माने , डॉ. अलका भोसले माजी प्राचार्य पी.जी. भोसले सर , मा.शिवाजीराव शिर्के, मा.उर्मिला जाधव , प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रुक्मिणी बहेनजी , महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूरचे सदस्य मा.शिवाजीराव माने ,मा.महिपती माने मा. गुलाबराव माने आदी शिक्षक व संस्था हितचिंतक उपस्थित होते. तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक यामध्ये मा.दादासाहेब जगताप , मा.सत्यवान शिर्के, मा.राजेंद्र वाघ ,सौ. मेघा गायकवाड सौ. यास्मीन मुजावर तसेच संस्थेतील सर्व आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा.अरुण माने सर यांनी केले .सूत्रसंचलन

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त