" नवीन पर्यटन स्थळांच्या निर्मिती मुळे महाबळेश्वर च्या वैभवात पडणार भर "

' महाबळेश्वर च्या मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नातून साकारत आहेत नवीन पर्यटन स्थळे '.....

 महाबळेश्वर : महाबळेश्वर वर निसर्गाने आपल्या निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. महाबळेश्वर हे आज पर्यंत येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरित जंगले, लाल चुटूक स्ट्रॉबेरी व ठराविक पर्यटन स्थळां मुळे प्रसिद्ध होते. परंतु गत वर्षांनु वर्षे ठराविक पर्यटन स्थळांचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना महाबळेश्वर मधील सद्य स्थितीत सुरू असलेल्या विकास कामांची गती पाहता आगामी काळात मात्र नवनवीन व आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय हा भविष्यात बहरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या मध्ये नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावाचे सुरू असलेले सुशोभीकरण हे जास्तीत- जास्त पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करून येथील स्थानिक उद्योग धंद्यांना नक्कीच तेजी देणारा आहे. त्याच बरोबर आज पर्यंत शहराच्या मध्य भागी असून देखील दुर्लक्षित असलेली ब्रिटिश कालीन पुरातन वास्तू  "सर दीन शाॅ पेटीट लायब्ररी "ही नूतनीकरणाच्या माध्यमातून आपली आगळी-वेगळी ओळख बनविणारा असून या अनुषंगाने पर्यटकांना या ठिकाणी एक नावीन्यपूर्ण वाचनालय अनुभवायला मिळणार आहे. त्याच प्रमाणे दिवसेंदिवस शहरातील वाहतुक व्यवस्था डिस्कळीत करण्यासाठी कारणीभूत ठरणारे अंतर्गत रस्ते देखील पालिका प्रशासक श्रीमती. पल्लवी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून  शहर सुशोभीकरणाच्या माध्यामातून नव्याने तयार होत असल्याने यामुळे वाहतुक समस्येवर देखील प्रभावी तोडगा निघणार असलेचे दिसत आहे..
ग्लेन ओगल डॅमचा होणार कायापालट...
महाबळेश्वर येथील तापोळा रस्त्यावर असणारे ग्लेन ओगल धरन आता लवकरच नविन रुपात दिसणार आहे.कारण केंद्र सरकारच्या वतीने सदर धरण सुशोभीकरण व खोली वाढविण्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.सध्या धरणात साठलेला गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.सध्या धरणाची पाणी साठवण क्षमता दिड हजार क्यूबिक लिटर इतकी असून गाळ काढल्यानंतर पाणी साठा साधारण १हजार क्यु.लिटरणे वाढणार असून तो साठा आता अडीच हजार क्यु.लि.होणार असल्याने शहरवासीयांना सहा महिने पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली.
सदर धरणाच्या चारही बाजूंनी दगडी पिचींग करण्यात येणार असून मध्यभागी आकर्षक कारंजे देखील बसविण्यात येणार आहेत.त्यामुळे भविष्यात महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना एक नवीन पर्यटन स्थळ पहावयास मिळणार आहे.पर्यटना सोबतच शहरवासीयांना मुबलक पाणी पुरवठा देखील होणार आहे.धरणाच्या सुशोभीकरणा सोबतच तेथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उद्यान देखील विकासीत करण्याची संकल्पना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी व्यक्त केली.ग्लेन ओगलच्या सुशोभीकरणा मुळे महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

 शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला