साताऱ्यात बकासुर गॅंगच्या 6 गुन्हेगारांच्या मुसक्या शाहूपुरी पोलीसांनी आवळल्या
ओमकार सोनावले - Sun 17th Jul 2022 06:15 am
- बातमी शेयर करा
2 अल्पवयीन मुलांचा समावेश .. शाहुपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचे पथक करत आहेत जोरदार कामगिरी
सातारा - येथील कोटेश्वर मैदान परिसरात युवकास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत लुटल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बकासूर गँग या नावाने दहशत माजविणाऱ्या टोळक्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंद असणाऱ्यांपैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोटेश्वर मैदान परिसरात शनिवारी दुपारी एक अल्पवयीन महाविद्यालयीन युवक शनिवारी दुपारी मित्रासमवेत आला होता. याठिकाणी मित्रासमवेत तो चर्चा करत असतानाच त्याठिकाणी धनराज घोडके, यश जांभळे, शिवम माने, आदित्य गोसावी व इतर युवक आले.त्यांनी मित्रासमवेत थांबलेल्या त्या अल्पवयीन महाविद्यालयीन युवकास बोलावून घेतले. त्याला कोयत्याचा धाक दाखवत घोडके व इतरांनी पैसे मागितले. पैसे नसल्याचे सांगताच घोडके, जांभळे व इतरांनी त्याला मारहाण केली. मारहाण करतानाच त्यांनी त्या युवकाचे पैशाचे पाकीट, तसेच मनगटी घड्याळ हिसकावले. याचदरम्यान त्याठिकाणी घोडके, जांभळेचे इतर साथीदार आले. त्यांनी महाविद्यालयीन युवकास मारहाण करत त्याच्या हातातील अंगठी, तसेच कानात असणारी सोन्याची बाळी ओढण्याचा प्रयत्न केला.सुरू असणारा गोंधळ पाहून त्या महाविद्यालयीन युवकाचे इतर मित्र आले. त्यांनाही घोडके, जांभळे व इतरांनी मारहाण करत कोयत्याने धाक दाखवला.

याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहून काहीजणांनी त्याठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी पळणाऱ्या काही युवकांना पाठलाग करून पकडले. याची फिर्याद त्या युवकाने नोंदवली असून, यात त्याने घोडके, जांभळे व इतरांनी ४४० रुपयांची रोकड असणारे पाकीट आणि मनगटी घड्याळ हिसकावून नेल्याचे नमूद केले आहे. यानुसार बकासूर गँगवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास निरीक्षक संजय पतंगे हे करीत आहेत
#sataranews
#sataranewscrime
#bakasurgangsatara
#satarapolice
#satarashahupuripolice
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 17th Jul 2022 06:15 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 17th Jul 2022 06:15 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 17th Jul 2022 06:15 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 17th Jul 2022 06:15 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 17th Jul 2022 06:15 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 17th Jul 2022 06:15 am
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 17th Jul 2022 06:15 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sun 17th Jul 2022 06:15 am












