बेडरुमध्ये कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त रेकाॅर्डिंग, साताऱ्यातील घटनेने खळबळ, पतीवर गुन्हा

सातारा -बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्याविरोधाततक्रार दिली आहे.बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्याविरोधाततक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३४वर्षांची असून, ती एका रुग्णालयात काम करते. बोअरवेल गाडी घेण्यासाठी पतीकडून तगादा सुरू होता. या कारणावरून पत्नीचा जाचहाट सुरू होता. पतीचे विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा केली असता मुलांना विष देऊन जीव देर्इन व तुझ्या वडिलांना खडी फोडायला पाठवीन, अशी वारंवार धमकी देत होता. एवढेच नव्हे तरपत्नी ज्या रुग्णालयात काम करते. त्या रुग्णालयात जाऊन दंगा करेन, अशी धमकीही देत असत. एके दिवशी बेडरुममध्ये पतीने छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पतीवर विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला