पत्रकार इम्तियाज मुजावर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

सातारा : सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील आज तकचे पत्रकार इम्तियाज मुजावर यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे. ''जावली तालुक्यातील दारू धंदे बंद करण्याच्या भानगडीत पडू नको, जिवंत राहणार नाही'' अशा आशयाच्या धमकीचे पत्र मुजावर यांना पाठविण्यात आले आहे. सर्व दारू व्यवसायिकांनी पत्राद्वारे ही धमकी दिली आहे. या घटनेचा सातारा पत्रकारांमधून निषेध व्यक्त केला जात असून दारू व्यवसायिकांनी ही धमकी दिली असल्याने त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. पत्रकार इम्तियाज मुजावर यांना त्यांच्या पत्त्यावर सर्व दारू व्यवसायिक असा उल्लेख करून आतमध्ये धमकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला