अंधाऱ्या कॅफेत पुन्हा धुडगूस; सातारकरांना हवाय पोलिसांच्या कारवाईचा 'भरोसा'

सातारा : सातारा शहरात अनेक ठिकाणी चालू असणाऱ्या कपल कॅफेंमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याच्या आवाज सातारा न्यूजने उठविला होता. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने देखील कारवाईचा बडगा उचलला होता. नियमाचे अनुकरण न करणाऱ्या व अंधार करून आक्षेपार्ह बैठक व्यवस्था असणाऱ्या कॅफे चालकांना नोटीस देऊन अशी बैठक व्यवस्था हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये अवैध प्रकार सुरु असणारे सुमारे १३ कॅफे सील देखील करण्यात आले होते. मात्र, मागले पाढे पंचावन्न या म्हणी प्रमाणे या कारवाईतून कोणतीही तमा न बाळगता सातारा शहरात पुन्हा एकदा अंधाऱ्या कॅफेंनी तोंड वर काढले आहे. अशा कॅफेंमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींसह शालेय शिक्षण घेणारे अल्पवयीन मुले-मुली देखील अश्लील चाळे करताना आढळून येत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करून देखील काही हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवावर पुन्हा तोंड वर काढणाऱ्या कॅफे चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे. 
     दरम्यान, कालपासून सातारा पोलीस दलातील भरोसा सेलच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम. नांद्रेकर मॅडम यांनी सातारा शहरातील कॅफेंवर धडक कारवाई मोहीम सुरु केली असून अशा बंदिस्त कॅफेंवर काय कारवाई होणार ? याची उत्सुकता आता सातारकरांना लागली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम. नांद्रेकर मॅडम यांनी काल केलेल्या धडक मोहिमेत अशा बंदिस्त कॅफेंची माहिती घेण्यात आली असून नियम न पाळणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम. नांद्रेकर यांनी दिली. 
   दरम्यान, कालच्या या कारवाईवेळी अजंठा चौक परिसरातील एका कॅफेत अल्पवयीन युवक-युवती आढळून आले आहेत. या कॅफेमध्ये पूर्णतः अंधार व बंदिस्त बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याने याठिकणी प्रेमी युगलांना अश्लील चाळे करण्यात मोकळीकता मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रेमीयुगल येत असतात अशा तक्रारी देखील येथील नागरिक वारंवार करत आहेत. त्यामुळे युवक-युवतींना वाममार्गाला लागण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या या कॅफे चालकांवर कडक आणि ठोस कारवाई कधी होणार ? पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नागरिकांना भरोसा देणार का ? हे पाहणे आता गरजेचे आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला