उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वाई ;  उडतरे ता वाई येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण रमेश बाबर यांचा आसाम गुवाहाटी येथे सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण आले त्याच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

 शहीद जवान प्रवीण बाबर सैन्य दलातील ई कमांडो फोर्स मध्ये होते त्यांचे वडील यांनी देखील सैन्य दलात सेवा केली होती, प्रवीण बाबर हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचे गुवाहाटी आसाम याठिकाणी सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण बुधवारी पहाटे आले, त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी उडतारे या त्यांच्या मूळ गावी सकाळी आठ वाजता आणण्यात आले यावेळी गावातून त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी शहीद जवान प्रवीण बाबर अमर रहे भारत माता कि जय या घोषणा देण्यात आल्या

यावेळी राज्यसभा खासदार नितीन पाटील किसनवीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम तहसीलदार सोनाली मेटकरी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

सातारा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना गोळ्यांच्या फैरी झाडून देण्यात आली, त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी,दोन मुली एक मुलगा एक भाऊ असा मोठा परिवार असून शहीद जवान प्रवीण बाबर यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी होता आणि बुधवारी त्याच्या निधनाची बातमी समजल्यावर सर्व उडतारे गावाला मोठा धक्का बसला होता यामुळे संपूर्ण वाई तालुक्यात मोठी हळहळल व्यक्त होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला