सातारा शहरांतील दोन सोन्याच्या दुकानात चोरी

सातारा : सातारा शहरातील दोन सराफी दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख 79 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोsatara लीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान शनिवार पेठ येथील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानांमध्ये एका अनोळखी महिला व पुरुषाने 33 हजार रुपये किंमतीची एक सोन्याच्या टॉप्स ची जोडी हातचलाखीने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, पोवई नाका येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानांमध्ये अज्ञात चोरट्याने सेल्समनची नजर चुकवून एक लाख 46 हजार रुपये किंमतीचे 21 ग्रॅम 740 मिली वजनाचे सोन्याचे कडे चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त