'तु भाजप चा प्रचार करतोस कायअसे म्हणत लोखंडी रॉड,कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केलेल्याला आरोपीला ७२ तासाचे आत अटक
Satara News Team
- Fri 3rd May 2024 05:43 pm
- बातमी शेयर करा
सातारा : गोवे ता.जि. सातारा गांवचे हद्दीत कोटेश्वर पुलाजवळ दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजण्याच्यासुमारास गुन्हयातील फिर्यादी हे सरबत व बर्फगोळा विक्री करीत असताना, काळया रंगाच्या मोटार सायकलवरुन तोंडाला रुमाल बांधून संशयित रजत राजेंद्र निंबाळकर वय २७, प्रवीण दत्तात्रय शेलार वय १९ व सुजित नामदेव मोरे वय २० तिघेहीरा राजाळे ता फलटण जि सातारा यांनी फिर्यादी यांच्या डोळयास चटणी पूड चोळून 'तु भाजप चा प्रचार करतोस काय, तुला लय मस्ती आली आहे काय' असे म्हणत फिर्यादी यास लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी करुन मोबाईल जबरदस्तीने चोरुन घेवून गेल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला होता
तपास पथकाने घटनास्थळाची पहाणी केली, आजुबाजूच्या लोकांच्याकडे व फिर्यादीकडे कौशल्याने तपास केला व गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे तीन संशईत इसमांची माहिती प्राप्त केली व त्याद्वारे संशईत इसम रहात असले ठिकाणी सापळा लावून तीन इसमांना कौशल्याने पकडून ताब्यात घेतले. व त्यांच्याकडे तपास कौशल्याने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेले हत्यार दोन लोखंडी रॉड, सुहाना अंबारी कंपनीची मिर्चीपुड, काळया रंगाची टि.व्ही.एस. कंपनीची एम.एच.११ डीके/५९५४ व जबरदस्तीने चोरलेला ५०००/- रुपये किमतीचा व्हीको कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट असा माल हस्तगत करुन सदरचा गंभीर व राजकियदृष्ट्या संवेदनशिल असा गुन्हा ७२ तासाचे आत उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अरविंद काळे पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे, अमोल माने, अजित कर्णे, राकेश खांडके, अजय जाधव, अमित इंझेंडे, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, स्वप्निल दोंड, केतन शिंदे, दलजीत जगदाळे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप आवळे, मालोजी चव्हाण, राजु शिखरे, तुकाराम पवार, किरण जगताप, शिवाजी डफळे यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 3rd May 2024 05:43 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 3rd May 2024 05:43 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 3rd May 2024 05:43 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 3rd May 2024 05:43 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 3rd May 2024 05:43 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 3rd May 2024 05:43 pm
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Fri 3rd May 2024 05:43 pm
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Fri 3rd May 2024 05:43 pm












