महाराष्ट्रतील बार्टी आधिनस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन

सातारा :  "बार्टी" च्या पुण्यातील मुख्य कार्यालयासह राज्यात विविध विभागांत असलेल्या कार्यालयांमध्ये बाह्य स्रोताद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेल्या दहा वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. याच्या निषेधार्थ गुरुवार पासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांना या कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बेमुदत आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असून, गुरुवारी कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. "बार्टी" कार्यालयात बाह्य स्रोताद्वारे सुमारे बाराशे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वाहनचालक, कार्यालय सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आस्थापना सहायक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक समतादूत, तालुका समन्वयक अशा विविध पदांवर हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये "बार्टी" मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मुक्तिभूमी येवला, बार्टी विभागीय कार्यालय नागपूर, त्याचबरोबर सर्व जिल्हास्तरीय जातपडताळणी समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. काम बंद आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील बार्टीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला असून मानधन वाढी बाबत जोपर्यंत ठाम असा शाश्वत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा निर्धार आंदोलन कर्त्यांनी केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त