चोराडे येथे खंडोबा यात्रेनिमित्त होणाऱ्या बैलगाडी शर्यतीची परवानगी रद्द करण्याची मागणी...

फाटी लगत उरमोडी कॅनलच्या मोठ्या पाटामुळे दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी बैलगाडी शर्यती होणार का....?

खटाव  : खटाव तालुक्यातील चोराडे येथे दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आले असून मौजे त्या चोराडे गावचे पूर्व दिशेस मायणी म्हासुर्णे रोड लगत आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. तथापी ज्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे ठिकाण नमुद केलेले आहे. त्या मैदानाच्या उत्तर, पश्चिम, दक्षिण बाजूस उरमोडी कॅनॉलचा मोठा पाट असून सदर कॅनॉलमध्ये पाणी सोडलेले होते व आहे. तसेच सदर मैदानालगत दोन विहिरी व शेततळे आहेत. तसेच सदर मैदानावर बैलगाडा शर्यत आयोजीत केल्यास सदरची बैलगाडी सदर कॅनॉल अथवा विहिरीकडे गेल्यास सदर बैल तसेच बैलचालक यांच्या जिवीतास धोका निर्माण होणार आहे.
     तरी आपले कार्यालयाकडे परवानगी मागणी करण्यात आली तसेच इतर संबंधीत अधिका-यांच्याकडे परवानगी मागताना दिशाभूल करुन तसेच उरमोडी कॅनॉल, विहिर, शेततळे याच्याबाबत सत्य माहिती लपविलेली दिसून येत आहे.सदर ठिकाणी बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकते.
तसेच मैदानाची जागा अपुरी असल्यामुळे तसेच उत्तर, पश्चिम, दक्षिण या बाजूस उरमोडी कॅनॉल असल्यामुळे सदर मैदानावर बैलगाडा शर्यतीचे नियोजन करणे उचित होणार नाही. तसेच नियोजीत ठिकाणी येणारे प्रेक्षक, बैलगाडा शौकीन यांच्या जिवीतास धोका होण्याचा संभव आहे.तसेच सदर बैलगाडा शर्यत आयोजीत करताना मा.सर्वोच्च न्यायालयाने नमुद केलेल्या अटी व शतींचे पालन केले जाणार नाही, त्याबाबतची कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जाणार नाही.


      त्यामुळे आयोजकाकडून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बैलगाडी शर्यतीसाठीची परवानगी रद्द करण्यात यावी, याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांना चोराडे  ग्रामस्थांनी दिले आहे.तर माहितीस्वव याच्या प्रति पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती खटाव, बांधकाम विभाग,वडूज, औंध पोलीस स्टेशन येथे ही देण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त