नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वरोग निदान शिबिर संपन्न.

देशमुखनगर : नांदगाव ता. सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री मातृत्व योजना व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहांजली महामुनी, डॉ. सौ. पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद साळोखे यांनी तपासणी आणि उपचार केले.
         यावेळी २६  गरोदर माता तर ५१ बालकांची तपासणी करून उपचार केले, तसेच ६५ सर्वसाधारण रूग्णांची तपासणी करण्यात आली.
     यावेळी गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसता नाही  काम करावे लागते यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे, माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावे अशा पद्धतीचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात आले.
    या शिबिराचे उद्घाटन नांदगावच्या सरपंच सौ. सारीका चव्हाण, खोजेवाडीच्या सरपंच सौ. वैशाली घोरपडे,कामेरीच्या सरपंच सौ. शुभांगी घाडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सरवदे, डॉ. स्वप्नील जाधव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगावच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त