पालिका शिक्षण मंडळामध्ये अचानक बदल्यांचा सावळा गोंधळ 22 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा घाट
Satara News Team
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा पालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासक मारुती भांगे यांची सेवानिवृत्ती तीन महिन्यावर आहे. असे असताना ऐन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच टप्प्यावर सातारा पालिका शिक्षण शाळांमधील 22 शिक्षकांच्या अचानक बदलीची ऑर्डर ऑनलाईन पद्धतीने निघाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला.
संबंधित शिक्षकांना दुपारी तीन वाजेपर्यंत तातडीने राहण्याचे आदेश फार्माविण्यात आल्याची माहिती आहे. ही बदली नियमबाह्य आहे असा आरोप पालिका शिक्षण मंडळ संघटनेच्या वतीने करण्यात आला असून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अचानक बदलीच्या सत्रामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली असून नक्की आपली बदली कुठे झाली, हे शोधण्यासाठी अध्यापनाचे काम सोडून शिक्षकांना झेडपी मध्ये धावपळ करण्याची वेळ आली.
सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या 17 शाळा असून त्यामध्ये 87 शिक्षक कार्यरत आहेत. नियमाप्रमाणे वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीन, वर्ग चार अशा बदल्या करताना त्या जून महिन्याच्या सुरुवातीला मे महिन्यातच करावयाच्या असतात. ग्राम विकास यंत्रणेचा बदल्यांबाबतचा जीआर सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाला लागू होत नाही. असे असताना सातारा पालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासक यांनी सातारा शहरातील पालिका शाळांच्या 22 शिक्षकांची बदल्यांची ऑर्डर काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. जर बदल्या करायच्या होत्या तर त्याची सेवा जेष्ठता यादी का प्रसिद्ध केली नाही, असा सवाल सातारा पालिका शिक्षण मंडळ संघटनेच्या वतीने विचारण्यात आला आहे. या बदल्या साधारणत: एप्रिल मे दरम्यान करून तसा कार्यकारी ठराव मुख्याधिकार्यांपुढे सादर करावयाचा असतो. आता प्रशासकीय राजवट असल्यामुळे त्याबाबतचे मार्गदर्शन मुख्याधिकार्यांमार्फत प्राप्त होणे गरजेचे होते. मात्र तशी कोणतीही प्रक्रिया प्रभारी प्रशासन मारुती भांगे यांनी राबवलेली नाही, असा शिक्षकांचा आरोप आहे.
शुक्रवारी ऑनलाईन बदल्यांचे निरोप धडाधड पडू लागल्यानंतर शिक्षकांची तारांबळ उडाली. नियमाप्रमाणे एकूण आस्थापनेच्या पाच टक्के बदल्या करावयाच्या असतात. मात्र प्रत्यक्षात 22 शिक्षकांच्या बदल्या एकदम कशा करण्यात आल्या, याचा तपशील मात्र उलगडलेला नाही. सध्या बीएलओ म्हणून बहुतांश शिक्षकांची मतदान केंद्रे निश्चित झालेली असतात. पटसंख्या, पालिका शाळांच्या भौतिक सुविधा या संदर्भातही त्या त्या शाळांमधील स्थानिक शिक्षकांचे योगदान असते. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये सातारा पालिकेची एकही शाळा वाढली नाही की पटसंखेत वाढ झाली नाही. त्यावेळी प्रशासकीय कार्यक्षमता भांगे यांनी दाखवली नाही. मात्र बदल्यांची ऑर्डर काढताना त्यांनी शिक्षकांना अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. प्रशासक म्हणजे हुकुमशहा नव्हे, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
शुक्रवारी दिवसभर कोणता शिक्षक कोणत्या शाळेत गेला, याची पडताळणी करण्याचे धावपळ सत्र दिवसभर सुरू होते. त्यामुळे काही शाळांमध्ये अध्यापनाचे सत्र होऊ शकले नाही. प्रत्यक्षात पाच टक्के नियमाप्रमाणे सहा शिक्षकांच्या बदल्या होणे गरजेचे होते. मिळालेल्या माहितीनुसार चार विनंती बदल्यांचे अर्ज प्रभासकांना प्राप्त झाले होते. त्याविषयी शिक्षक संघटनांची हरकत नाही. मग चार शिक्षकांच्या बदल्यासाठी 22 शिक्षकांची परवड कशाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. या प्रकरणावर संबंधित शिक्षण मंडळाचे प्रशासक मारुती भांगे त्यांच्या कार्यव्यवस्थेतेमुळे प्रतिक्रियांसाठी उपलब्ध झाले नाहीत.
या प्रकरणाची काही माजी पदाधिकार्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे. येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी शिक्षक संघटनेला पाठिंबा दिला असून भांगे यांनी या बदल्या मागे न घेतल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बदल्या करावयाच्या होत्या तर पालिका प्रशासनाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या सेवा जेष्ठता यादी का प्रसिद्ध झाल्या नाहीत? त्यांना का कळवले गेले नाही?7 जुलै ही बदलीची तारीख नव्हे. या बदल्या 20 मे ते 30 मे या दरम्यानच होणे गरजेचे होते. भांगे यांनी लक्षात ठेवावे ते जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, नगरपालिकेचे नव्हे. ग्रामविकास यंत्रणेचे सर्व नियम नगरपालिकेला लागू होतात असे नाही. त्यांनी बदल्या करताना शिक्षकांशी चर्चा करून बदल्यांचे सत्र राबवायला हवे होते. त्यांनी समन्वयाने यातून मार्ग काढावा अन्यथा त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
संबंधित बातम्या
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 7th Jul 2023 09:49 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 7th Jul 2023 09:49 pm













