सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा एक्स्पो येत्या शुक्रवार व शनिवारी
Satara News Team
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असून, स्पर्धेचे हे १२ वे वर्ष आहे. या स्पर्धेचा भव्य एक्स्पो या वर्षी प्रथमच दोन दिवस आयोजित केला असून तो *शुक्रवार व शनिवार या दोन्हीही दिवशी आयोजित केला आहे. पहिल्या दिवशी दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत आणि २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या दरम्यान हा एक्स्पो असणार आहे. शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै अभयसिंहराजे भोसले सभागृह येथे या एक्स्पोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सातारचे लोकप्रिय आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या शुभहस्ते आणि अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये टी शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टाईमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे. त्यासाठी स्पर्धकांनी नांव नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना आलेला ई-मेल अथवा त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवणे हे अनिवार्य आहे. प्रत्येक स्पर्धकाने वयाचा व रहिवासी पत्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे सर्व स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेसकीट हे शक्यतो शुक्रवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी ताब्यात घ्यावेत, जेणेकरुन दुसऱ्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांनादेखील रेस कीट व बिब घेणे सोयीचे होईल आणि त्यामुळे दोन्ही दिवशी गर्दीमुळे स्पर्धकांची होणारी गैरसोय टाळता येईल, असे आवाहन रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी व संयोजन समितीचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, उपाध्यक्ष निशांत गवळी व सचिव डॉ रंजिता गोळे यांनी संयुक्तरित्या केले आहे.
#JBGSataraHillHalfMarathon
#RajdhaniSatara
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Thu 31st Aug 2023 07:48 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Thu 31st Aug 2023 07:48 pm












