लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच एका व्यावसायिकावर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला
जुबेर शेख - Sun 4th Jun 2023 04:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दत्ता जाधवचा मुलगा लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पैलवान विक्रम वाघमारे हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान प्रतापसिंह नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता जाधव यांच्या मुलगा जो नुकताच मोक्यातून सुटून बाहेर आला आहे. त्याने आणि त्याच्या सहा साथीदारांनी भंगार व्यावसायिक पैलवान विक्रम वाघमारे याच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. मात्र, सुदैवाने यात विक्रम पैलवान बचावला असून गंभीर जखमी असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच लल्लन जाधव हा संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का मधून सुटून बाहेर आला आहे.
सातारा शहर पोलिसांनी लल्लन जाधवसह आणखी 6 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर लल्लन व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संपूर्ण प्रतापसिंह नगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागील भांडणातून अथवा वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
crime
dattajadhav
lalanjadhav
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Sun 4th Jun 2023 04:28 pm
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Sun 4th Jun 2023 04:28 pm












