धबधबेआणि इतर ठिकाणी धांगडधिंगा, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वनकायद्यानुसार होणार कारवाई
धबधब्यावरील धोके टाळण्यासाठी वनविभाग ॲक्टिव्ह मोडवरSatara News Team
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा : बहरात आलेल्या पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि त्यातून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी वनविभाग ॲक्टिव्ह मोडवर आले आहे.वनक्षेत्रासह धबधबे आणि इतर ठिकाणी धांगडधिंगा, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वनकायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे. वनविभाग, तसेच पोलिस यंत्रणा याबाबतचा संयुक्त आराखडा करणार असून, त्यासाठीचा पत्रव्यवहार देखील सुरू झाला आहे.
कास, ठोसेघरसह इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे त्याठिकाणचे ठोसेघर, वजराई, भांबवली तसेच एकीव येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी, तसेच परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.या पर्यटकांत तरुणाईच जास्त प्रमाणात असते. या युवकांपैकी अनेक जण नशेच्या अमलाखाली असतात. ते युवक शांतता धोक्यात आणतात. यातून काही दुःखद घटना देखील घडतात. या घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या आहेत.
धबधबा परिसरातील धोकादायक ठिकाणी बंदिस्त करणे, आवश्यक त्याठिकाणी कुंपण घालत सूचना फलक लावणे, बंदोबस्तासाठी वनकर्मचाऱ्यांसह स्थानिकांची नेमणूक करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या उपाययोजना राबवूनही युवक स्वत:चा, तसेच इतरांच्या जिवास धोका निर्माण होईल, असे कृत्य करत असतात.
यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात. एकीव येथील धबधबा परिसरातील दुर्दैवी घटनेनंतर वनविभाग ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. त्यांनी यापुढील काळात हुल्लडबाजांना आवर घालण्याबरोबरच वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वनकायद्यांचा आधार घेण्याचे ठरवले आहे.यानुसार हुल्लडबाजांवर फौजदारी संहिता, तसेच वनकायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्याचे वनविभागाच्या विचाराधीन आहे. यासाठीचा पत्रव्यवहार वनविभागाने पोलिस यंत्रणेशी सुरू केला आहे.
आवरा स्वत:ला, सावरा जिवाला
पावसाळ्यात फुललेला निसर्ग सर्वांना खुणावत असतो. या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात काससह परिसरातील अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. यामध्ये तरुणाईचा अधिक भरणा असतो. निसर्गाच्या सान्निध्यात केलेले फोटोसेशन, सेल्फी सोशल मीडियावर टाकत त्याला मिळणाऱ्या लाईक्स आणि येणाऱ्या कमेंटस हा तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय असतो.जास्तीतजास्त लाईक्स आणि कमेंटस् मिळवण्याच्या प्रयत्नात इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याच्या नादात आत्मभान हरवते. या हरवलेल्या आत्मभानामुळे दुर्दैवी घटना घडतात. हे टाळण्यासाठी तरुणाईने स्वत:ला आवरत जिवाला सावरणे महत्त्वाचे आहे.
सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य..
धोक्याच्या ठिकाणी सुरक्षितता बाळगण्यासाठीच्या वनविभाग, पोलिस यंत्रणा सूचना करत असते. त्याकडे दुर्लक्ष करत अतिउत्साही तरुणाई स्वत:चा जीव धोक्यात घालते. वारंवार सूचना करूनही पर्यटक न जुमानता दांडगाई करत असल्याने अनेकदा वन, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव गप्प बसणे भाग पडते. त्याठिकाणी असणारे कर्मचारी आपल्या सुरक्षिततेसाठी असून, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सर्व सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
संबंधित बातम्या
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Tue 18th Jul 2023 08:52 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Tue 18th Jul 2023 08:52 pm













