दोन टक्के प्रकरणात अधिका-यास एक दिवसाची पोलीस कोठडी
Satara News Team
- Thu 4th Aug 2022 09:29 am
- बातमी शेयर करा
सातारा : कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्के प्रमाणे 92 हजार रुपयांची लाच मागून मागून ती लाच स्वीकारल्याप्रकरणी सतीश लब्बा या पाटबंधारेच्या क्लास 1 अधिकार्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून एसीबी विभागाने त्याच्या घरावर छापे टाकले आहेत.सतीश पंचाप्पा लब्बा (वय 48, सध्या रा.सदरबझार, सातारा मूळ रा.सिध्देश्वर पेठ, सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून तो जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अर्थात पाटबंधारेचा (वर्ग 1) अधिकारी आहे. या प्रकरणातील तक्रारदार 54 वर्षीय कंत्राटदार आहे. मंगळवारी दुपारी सतीश लब्बा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 92 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशीरा त्याला अटक केली.बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर बचाव व सरकार पक्षाचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह विविध मुद्यांचा तपास करायचा असल्याचा सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी लब्बाला 1 दिवसाची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, मंगळवारी दुपारी ट्रॅप झाल्यानंतर रात्री उशीरा सातारा व सोलापूर येथील लब्बाच्या घरावर एसीबी विभागाने छापे टाकले. संपत्तीबाबतची माहिती संकलीत केली जात असून त्याबाबतची माहिती घेतली जात असल्याचे एसीबी विभागाने सांगितले.
#crimenews
#acbsatara
#satarapolice
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 4th Aug 2022 09:29 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 4th Aug 2022 09:29 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 4th Aug 2022 09:29 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 4th Aug 2022 09:29 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 4th Aug 2022 09:29 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 4th Aug 2022 09:29 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 4th Aug 2022 09:29 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 4th Aug 2022 09:29 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 4th Aug 2022 09:29 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 4th Aug 2022 09:29 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 4th Aug 2022 09:29 am











