इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Satara News Team
- Sun 10th Jul 2022 06:06 am
- बातमी शेयर करा

इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पंढरपूर :- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, श्री.प्रल्हाद दास, भक्तीप्रेम स्वामी, कृष्णकांत दास आदि उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विश्व बंधुत्व,ऐक्य, एकता, सहिष्णूता, शांती निर्माण करण्यासाठी भुवैकुंठ माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणत लाभ घेतात. १५ एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती, बाल संस्कार वर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्त निवास,असे विविध उपक्रम होणार आहे. मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेचा सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे. राज्याला सुजलाम सुफलाम करुन विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंदीर परिसरातील प्रभुपाद घाटाची पाहणी केली.
#pandharpur
#sataranews
#satarazilhaparishad
#cmeknathshinde
#satara#collectoroffice
#cmomaharashtra\
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 10th Jul 2022 06:06 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sun 10th Jul 2022 06:06 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sun 10th Jul 2022 06:06 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sun 10th Jul 2022 06:06 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 10th Jul 2022 06:06 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sun 10th Jul 2022 06:06 am
संबंधित बातम्या
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
- Sun 10th Jul 2022 06:06 am
-
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
- Sun 10th Jul 2022 06:06 am