उंब्रज पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा दुचाकी मोबाईल जप्त

उंब्रज : उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत उंब्रज ते चोरे जाणाऱ्या रोडनजीक बाभळीच्या झाडाच्या खाली तीन पानी जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत तीन पानी पत्त्यांसह, 7 मोबाईल, 6 मोटर सायकली व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 8 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल उंब्रज पोलीस हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना उंब्रज गावच्या हद्दीत काहीजण झाडाखाली पत्यांचा डाव खेळत आहेत. त्यावरून उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी जावून टाकलेल्या छाप्यात शिवा बाबु राठोड, रवि नाना चव्हाण (दोघेही रा. शिवडे), राजू पोपट जाधव, विलास शिऊ राठोड, संजय भिकु चव्हाण, रामचंद्र चंद्रकांत जाधव, बाळू वेनू राठोड (सर्वजण रा. उंब्रज, ता. कराड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ, गणेश कुंदे, पो. कॉ. सुनिल लोहार, पो. कॉ. राजकुमार कोळी, होमगार्ड स्वप्नील मोरे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला