सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या

सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कामी केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 सवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. संवर्ग एक, दोन, तीन व चार, विस्थापित राऊंड व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदली आदेश प्रसिध्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी विविध संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर, एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर त्यांना संवर्ग दोनमध्ये प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त