पाचगणीत मूलभूत सुविधा कोमात; मात्र अत्याधुनिक सुविधा जोमात

मूलभूत इ-टॅाईलेट बंद मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रीक गाड्यांच चार्जीग स्टेशन सुरु

पाचगणी : सर्वसामान्य जनता व पर्यटकांच्या मुलभुत सुविधांना प्राधान्य न देता यात्रिंक युगातील गोष्टीना अव्वल स्थान देणाऱ्या पांचगणी नगरपालिकेच्या व्यथा अन कथा बाबत पांचगणी शहरात चर्चा रंगु लागल्या आहेत. पाचगणी शहरात २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इलेक्ट्रीक बाईक चार्जीग मशीन पॅाईटचे उद्घाटन पाचगणी नगरपालिकेकडुन करण्यात आले आहे. पांचगणी शहराला लाखो पर्यटक भेट देत असताता. पर्यटकांच्या मुलभुत गरजांनकडे कानाडोळा करत २ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले इटॅाईलेट गत चार वर्षाहुन अधिककाळ देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे “माझी वसुधंरा “अभियाना अतर्गत यात्रीक युगातील नव्याने विद्युत उर्जेवर चालणाऱ्या गाड्याची व्यवस्थे करता चार्जींग स्टेशन पांचगणी नगरपालीकेकडुन सरु करण्यात आले आहे . पांचगणी नगरपालीका स्वच्छतेत अव्वल असताना शहरातील शौचालयाची बिकट अवस्था , कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले इटॅाईलट मात्र बंद हा विरोधाभास सर्वसामान्य जनता व पर्यटकांची भ्रमिनिरास करणारा आहे . गत तीन वर्षापासुन पांचगणी नगरपालीकेवर प्रशासक लागु आहे . पांचगणीत प्रशासक म्हणुन आलेल्या अधिका-याच्या कारभारावर माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष कोणत्याही राजकीय नेत्याच लक्ष नाही . पांचगणी नगरपालीकेता कारभार दिवसे दिवस महमंद तुघलघी होत असल्याची चर्चा आहे . पांचगणी नगरपालीका स्थानिक स्वराज्य संस्थेने नागरीकांच्या मुलभुत गरजांना समोर ठेवुन शहराच्या विकासाचे प्रकल्प हाती घ्यावे यात कुठलीच शंका नाही . मात्र नामाकंन मिळवण्यासाठी मुलभुत गरजांना बाजुला ठेवत . फक्त दिखावुपणासाठी उभारण्यात आलेले प्रकल्प हे कीती लोकाभिमुख आहे यांचा सारासार विचार पांचगणी नगरपालीकेच्या प्रशासकाने करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडुन होत आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त