पाडळोशी परिसरात दुपारी दोन पासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा थयथयाट

वीजपुरवठा विस्कळीत :धायटी(चाफळ) नजीक वाहतूक झाली ठप्प

चाफळ : चाफळ विभागातील पाडळोशी परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी  वाऱ्याने परिसरातील काही गावांमध्ये नुकसान झाले आहे त्याचबरोबर विद्युत वितरण कंपनीचे खांब वाकल्याने काही ठिकाणी विद्युत वाहक तार तुटल्याने पुरवठा खंडित झाला आहे. धायटी नजीक वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 


                  चाफळ विभागात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पावसामुळे धायटी येथे  नजीक बांधण्यात येत असलेल्या नवीन फरशी पुलाशेजारील शेतातून तयार केलेल्या रस्त्यात वरती मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली तसेच पाडळोशी डोंगरात असलेला विद्युत पोल पडला असून विद्युत वाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. मात्र विद्युत कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वायर सोडून वाहतूक सुरळीत केली. चाफळ परिसरात असणाऱ्या पाडळोशी, मसुगडेवाडी धायटी,तावरेवाडी यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नदी,नाले, ओढे, तुडुंब वाहू लागले. या पावसामुळे शेतातून  काढलेला कडबा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
                   चाफळ परिसरात रस्त्यांची कामे धीम्या गतीने चालू आहेत. फरशी पूल बनवताना काही ठेकेदारांनी रस्ता पुलाच्या शेजारून रस्ता तयार करून वाहतूक सुरू केली आहे. मात्र वळीवाचा जोरदार पाऊस आल्याने या शेतातील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. तरी संबंधित ठेकेदारांनी जून पूर्वी रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त